JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral News : 365 दिवसांपैकी 300 दिवस झोपते व्यक्ती; कारण जाणून बसेल धक्का

Viral News : 365 दिवसांपैकी 300 दिवस झोपते व्यक्ती; कारण जाणून बसेल धक्का

जगभरातील सर्वच लोकांना आळस येतो. मात्र असेही काही लोक आहेत जे कायमच कंटाळलेले, आळस देत असतात. आळशी लोकांच्या वेगवेगळ्या गोष्टी समोर येत असतात.

जाहिरात

365 दिवसांपैकी 300 दिवस झोपतो व्यक्ती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 16 जून : जगभरातील सर्वच लोकांना आळस येतो. मात्र असेही काही लोक आहेत जे कायमच कंटाळलेले, आळस देत असतात. आळशी लोकांच्या वेगवेगळ्या गोष्टी समोर येत असतात. मात्र सध्या अशा एका व्यक्तीची चर्चा होतेय जो कायमच झोपलेला असतो. 365 दिवसांपैकी तो 300 दिवस झोपलेलाच असतो. हा व्यक्ती नेमका कोण आहे आणि यामागे नेमकं काय कारण आहे याविषयी जाणून घेऊया. राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील भडवा गावातील रहिवासी असलेल्या पुरखारामने त्याच्या असामान्य झोपण्याच्या पद्धतीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्यक्ती चक्क वर्षातील 365 दिवसांपैकी 300 दिवस झोपलेला असतो. यामागे एक गंभीर समस्या असल्याचं समोर आलं आहे.

अ‍ॅक्सिस हायपरसोमनिया हा एक दुर्मिळ झोपेचा आजा आहे. हा व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहे. ज्यामुळे तो वर्षातील तर 300 दिवस झोपेच्या अवस्थेत घालवतो. यामुळे अनेकांनी त्याची तुलना रामायणातील कुंभकर्णाशी केली. जो सहा महिने कोणताही त्रास न घेता झोपला होता. Viral News : बाथरुममध्ये आरामात बसली होती व्यक्ती; वर पाहताच दिसला भलामोठा अजगर, पुढे घडलं असं की… पुरखाराम सुरुवातील कमी झोपायचा हळू हळू त्याचं झोपणं वाढलं आणि ते 300 दिवसांपर्यंत गेलं. तो सुरुवातीला 15 तास झोपायचा. या गोष्टीमुळे त्याचे कुटुंबीयही चिंतेत होते. यासाठी त्याच्या कुटुंबियांनी वैद्यकिय मदतही घेतली. मात्र याचा काहीच फायदा झाला नाही आणि दिवसेंदिवस त्याची स्थिती अजूनच खराब होत गेली. तो जास्तीत जास्त झोपू लागला. दरम्यान, पुरखारामची पत्नी, आई कुटुंबिय त्याची बरी होण्याची अपेक्षा करत आहेत. मात्र औषध घेऊनही त्याला थकवा जाणवतो. त्याला थकव्यासोबत डोक्यात तीव्र वेदनाही होतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या