जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral News : बाथरुममध्ये आरामात बसली होती व्यक्ती; वर पाहताच दिसला भलामोठा अजगर, पुढे घडलं असं की...

Viral News : बाथरुममध्ये आरामात बसली होती व्यक्ती; वर पाहताच दिसला भलामोठा अजगर, पुढे घडलं असं की...


बाथरुमच्या शॉवरवर बसला होता भलामोठा अजगर

बाथरुमच्या शॉवरवर बसला होता भलामोठा अजगर

साप, नाग, अजगर हे खूप विषारी आणि धोकादायक प्राणी आहेत. कधी कुठे लपून बसतील काही सांगू शकत नाही. त्यामुळे त्यांचं नाव घेतलं तरी अनेकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 16 जून :  साप, नाग, अजगर हे खूप विषारी आणि धोकादायक प्राणी आहेत. कधी कुठे लपून बसतील काही सांगू शकत नाही. त्यामुळे त्यांचं नाव घेतलं तरी अनेकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. आत्तापर्यंत हे धोकादायक प्राणी घरातील विविध कोपऱ्यामध्ये निघाल्याचं पहायला मिळालं. याच्या धक्कादायक घटनाही सोशल मीडियावर चर्चेत आल्या. अशीच एक घटना सध्या चर्चेत आली आहे ज्यामध्ये एका व्यक्तीच्या घरातील बाथरुममध्ये चक्क भलामोठा अजगर निघाला. ऐकूनच अंगावर काटा उभा राहतो. हे प्रकरण नेमकं काय आणि कोणत्या ठिकाणचं आहे याविषयी जाणून घेऊया. एक व्यक्ती घरातील बाथरुममध्ये बसली होती. अचानक त्याला बाथरुममधील शॉवरवर भलामोठा अजगर बसलेला दिसला. हे भयानक दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमिनच सरकली. त्याने लगेचच सर्प पकडणाऱ्या सर्प मित्राला फोन केला. हडसन स्नेक कॅचिंकमध्ये फोन लावताच सर्प पकणारे लोक त्याच्या घरी पोहोचले. आणि त्याने तेथून त्या अजगराला काढले.

News18लोकमत
News18लोकमत

याविषयी हडसन स्नेक कॅचिंकने त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्टही शेअर केली. ज्यामध्ये त्या अजगराचे फोटो पहायला मिळत आहेत. चित्रांमध्ये 6 फुटांचा अजगर शॉवरवर स्वतःला गुंडाळून बसलेला दिसत आहे. अजगर पकडणाऱ्या अॅंथनी जॅक्सनने News.com.au ला सांगितले की तो शिकारी अजगर होता. त्याने मला चावण्याचाही प्रयत्न केला.

ही घटना ऑस्टेलियाची असून सध्या ही फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. क्वीन्सलॅंडमधील राहणाऱ्या व्यक्तीच्या घरी ही घटना घडली. फोटोंवरुन तुम्ही अंदाज लावू शकता की, अजगर किती धोकादायक होतं. त्याला पाहून व्यक्तीची काय अवस्था झाली असेल याचा अंदाज लावणंही कठिण आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात