JOIN US
मराठी बातम्या / Viral / चालत्या ट्रेनमधून व्यक्ती खाली पडला अन्.., अंगावर काटा आणणारा Video

चालत्या ट्रेनमधून व्यक्ती खाली पडला अन्.., अंगावर काटा आणणारा Video

जगभरातील लोक दैनंदिन धकाधकीच्या जीवनात रेल्वेनं प्रवास करतात. रेल्वेच्या प्रवासादरम्यान प्रवाशांना खूप सतर्क आणि काळजी घेण्याची आवश्यकता असते अन्यथा अनेक धक्कादायक घटना घडू शकतात.

जाहिरात

रेल्वे स्थानकावरील व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 मे : जगभरातील लोक दैनंदिन धकाधकीच्या जीवनात रेल्वेनं प्रवास करतात. रेल्वेच्या प्रवासादरम्यान प्रवाशांना खूप सतर्क आणि काळजी घेण्याची आवश्यकता असते अन्यथा अनेक धक्कादायक घटना घडू शकतात. रेल्वे स्थानकावरील रोज एखादी तरी घटना समोर येत असते. रेल्वेमध्ये चढताना उतरताना हमखास कोणाचा ना कोणाचा तरी अपघतात होतो. अशा घटनांचे अनेक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर समोर आले आहेत. अशातच यामध्ये आणखी एका घटनेची भर पडली असून याचाही व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र चढताना त्याचा पाय अडखळतो आणि ट्रेनसोबत तो ओढला जातो. तेवढ्या एक महिला शिपाई तात्काळ तत्परनेनं त्या व्यक्तीला बाजूला ओढलं आणि त्याचा जीव वाचवला. हा व्हिडिओ झारखंडचा आहे. झारखंडच्या टाटानगर रेल्वे स्थानकावर, धडाकेबाज आरपीएफ कॉन्स्टेबल एसके मीना यांनी एका प्रवाशाला प्लॅटफॉर्म आणि चालत्या ट्रेनमध्ये पडण्यापासून वाचवले. या धाडसी महिला आरपीएफ कॉन्स्टेबलचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आरपीएफने या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रवासी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून जवानाच्या रुपातील देवदूत महिलेवर कौतुकांचा वर्षाव करत आहे. अनेक लाईक्स आणि कमेंटचाही वर्षाव व्हिडीओवर होत आहे.

संबंधित बातम्या

दरम्यान, यापूर्वीही रेल्वे स्थानकावरच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. अनेक अपघातातून थोडक्यात बचावतात. तर काहीजण स्वतःहून रेल्वेस्थानकावर धक्कादायक पाऊल उचलतात. अशा घटना घडू नये आणि काही चुकीचं घडू नये म्हणून कायमच रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या