JOIN US
मराठी बातम्या / Viral / ओ तेरी! चक्क गोल गोल अंडा; काय आहे या अंड्याचा फंडा पाहा VIRAL VIDEO

ओ तेरी! चक्क गोल गोल अंडा; काय आहे या अंड्याचा फंडा पाहा VIRAL VIDEO

अंडाकृतीऐवजी गोलाकार अंड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जाहिरात

गोल अंडं (फोटो - इन्स्टाग्राम)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कॅनबेरा, 16 जून : अंडं म्हटलं की ते अंडाकृतीच असतं. पण तुम्ही कधी गोल अंडं पाहिलं आहे का? अशाच गोल अंड्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या गोल अंड्याची किमतीही इतकी आहे की आकडा फक्त वाचूनच तुम्हाला धक्का बसेल. आता असं गोल अंडं आहे कुठे? या गोल अंड्याचा फंडा नेमका काय? त्याची किंमत किती? ते पाहुयात. अत्यंत दुर्मिळ असं अंडं ऑस्ट्रेलियात सापडलं आहे. मेलबर्नमधील एका सुपरमार्केटमध्ये हे अंडं होतं. जर्नलिस्ट जॅकलिन फेलगेटने सोशल मीडियावर या अंड्याचा फोटो पोस्ट केला आहे. जॅकलीनने पोस्टमध्ये सांगितल्यानुसार तिने हे अंडं विकत घेतलेलं नाही तर तिच्या एका फॉलोअरचा हा व्हिडीओ आहे. पण त्याचा असा गोलाकार आकार पाहिल्यानंतर ती त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यापासून स्वत:ला रोखू शकली नाही. सामान्यपणे अंड अंडाकृती म्हणजे ओव्हल आकाराचं असतं. पण अंडंच अंडाकृती नसेल तर साहजिकच चर्चा होणार. बाबो! 20 रुपयाची मॅगी 400 रुपयाला; असं काय आहेत यात पाहा हा VIRAL VIDEO जॅकलीने या गोल अंड्याबाबत गुगलवर अधिक माहिती सर्च केली. तेव्हा कोट्यवधीत एखाद अंडं गोल असतं, अशी माहिती तिला मिळाली. शिवाय याआधी सापडलेलं गोल अंड तब्बल 78 हजार रुपयांना विकलं गेल्याचंही समजलं.  सामान्यपणे एक अंडं 5-6 रुपयांना मिळतं. पण गोलाकार अंड्याची किंमत हजारो रुपयांपर्यंत आहे. गोल अंड्याचा हा व्हिडीओ पाहिल्यावर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने तो चॉकलेटमध्ये बुडवलेला बॉल वाटत असल्याचं म्हटलं आहे. एकाने या अंड्याच्या किमतीवरून इतके पैसे कोण खर्त करेल, असं म्हटलं. तर एकाने आपल्याकडेही असं गोल अंडं होतं, ते आपण खाल्लं पण ते इतक्या किमतीला विकलं जाऊ शकतं, याची कल्पना नसल्याचं म्हटलं. त्यामुळे पुढच्या वेळी असं अंडं सापडलं तर ते आपण विकू, असं त्यानं सांगितलं. देवाची करणी की आणखी काही…! नारळात कसं आणि कुठून येतं पाणी ते इथं पाहा @jacquifelgate इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ.

संबंधित बातम्या

तुम्हाला कधी असं गोल अंडं सापडलं होतं का? त्याचं तुम्ही काय केलं? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या