अनाथ मुलाला दत्तक घेण्यासाठी गर्दी
नवी दिल्ली 16 जुलै : अनाथ मुलांसाठी आई-वडिलांशिवाय आपलं आयुष्य घालवणं खूप अवघड असतं. त्यांना ना त्यांच्या आई-वडिलांचं प्रेम मिळते ना सांभाळायला कोणी असतं. पण अमेरिकेतील एक 4 वर्षांचा मुलगा अनाथ असूनही खूप नशीबवान आहे. त्याच्याकडे इतकी संपत्ती आहे की तो एक-दोन नव्हे तर अनेक नोकर ठेवू शकतो. सध्या तो आपल्या आजी-आजोबांसोबत राहत असला तरी त्याला दत्तक घेण्यासाठी लोकांची गर्दी झाली आहे. शेवटी हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं आहे. सगळ्या लोकांच्या नजरा त्या मुलावर आहेत. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी 4 जुलै रोजी 22 वर्षीय रॉबर्ट क्रिमोने इलिनॉयच्या हायलँड पार्कमध्ये 7 जणांची गोळ्या झाडून हत्या केली होती. यामध्ये इरिना आणि केविन यांचाही मृत्यू झाला. त्यांचा 3 वर्षांचा मुलगा एडन मॅक्कार्थी तिथेच फिरताना आढळून आला. त्यावेळी अन्य कोणी जवळचा नातेवाईक पुढे न आल्याने अधिकाऱ्यांनी त्याला त्याच्या आजी-आजोबांच्या ताब्यात दिलं. एका व्यक्तीने त्याच्या संगोपनासाठी लोकांची मदत मागितली. त्याला एवढी मदत मिळाली की जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. धक्कादायक! महिलेची प्रसूती सुरू असताना अचानक डॉक्टरच जमिनीवर कोसळले; ऑपरेशन थिएटरमध्येच मृत्यू लोकांनी मुलासाठी खूप दान दिलं. काही दिवसांत 3.3 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 27 कोटी रुपये जमा झाले. यानंतर मुल दत्तक घेणाऱ्यांची रांग लागली होती. त्याच्या आईकडील आजी-आजोबा तर त्याला सांभाळत होतेच पण मग वडिलांचे आई-वडील, काका-काकूंसह अनेकजण पुढे आले. कोर्टात दाद मागितली गेली. यावर मुलाच्या आजीने म्हटलं की त्याच्या वडिलांकडील आजी म्हातारी आहे. ती स्वतःच एकटी राहाते, अशात ती माझ्या नातवाची काळजी कशी घेईल. मात्र मार्गोने हा दावा फेटाळून लावला. ते म्हणाली की लेव्हबर्ग मुलाला गोंधळात टाकत आहे आणि त्रास देत आहे. हायलँड पार्क हत्याकांडाच्या वेळी मार्गोलाही गोळ्या घालण्यात आल्या होत्या. तेव्हा ती तिचा मुलगा, त्याची पत्नी आणि नातवासोबत परेडमध्ये सुट्टीसाठी गेली होती. एक गोळी तिच्या कानाजवळ लागली आणि तिच्या मानेवरून गेली पण त्याची जखम जीवघेणी नव्हती. आता ती एडनची एकमेव पालक होण्यासाठी धडपडत आहे. इडनची दुसरी आजीही हक्क सोडायला तयार नाही. अशात मुलगा अनेकदा या सगळ्यापासून दूर राहण्यासाठी आपल्या पालकांच्या घरी जातो. आता मुलगा जिथे झोपते तिथे व्हिडिओ कॅमेरे लावावेत जेणेकरून त्यावर लक्ष ठेवता येईल, अशी मागणी होत आहे. न्यायालय या प्रकरणावर लवकरच निकाल देणार आहे.