हवेत उडाले लोक
नवी दिल्ली 18 जून : भारतातील अनेक राज्यांना धडकलेल्या बिपरजॉय वादळामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं आहे. या वादळामुळे देशाच्या अनेक भागात भितीदायक दृश्ये पाहायला मिळाली. एकीकडे बिपरजॉय वादळामुळे अनेकांचं आयुष्य कठीण झालं आहे, तर दुसरीकडे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओनं सर्वांनाच धक्का दिला आहे. या व्हिडिओमध्ये वादळाचं भीषण रूप पाहायला मिळत आहे. वादळापासून वाचण्यासाठी लोक छताला धरून उभे आहेत. मात्र, वारे एवढ्या जोरात वाहत आहेत की, हे सगळं करूनही माणसं उडून जात आहेत. या व्हिडिओचा चक्रीवादळ बिपरजॉयशी काही संबंध नाही. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका रेस्टॉरंटमधील असल्याचे दिसत आहे, जिथे अचानक वादळाने थैमान घातल्याने जेवण करायला आलेले लोक अडचणीत आले. रेस्टॉरंटमध्ये वादळ वेगाने येत असून खुर्च्या आणि टेबलही उडवत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. वादळापासून वाचण्यासाठी काही लोक खांबाला धरून उभा आहेत. मात्र, वारे एवढ्या वेगाने वाहत आहेत, की ज्या पोलचा लोकांनी आधार घेतला होता, तोच खांब जोराच्या वाऱ्यामुळे उडाला.
खांब निघताच त्याला धरून उभ्या असलेल्या काही लोकही हवेत उडाले. काही लोकांनी योग्य वेळी पोल सोडले. तर काही लोक खांबासह हवेत उडाले. एक व्यक्ती खांबावरून जमिनीवर पडतानाही दिसते. हे दृश्य खूपच भयावह आहे. संपूर्ण रेस्टॉरंटची सेटिंग खराब झाली आहे. लोक प्रत्येक कोपऱ्यावर उभे आहेत आणि हे प्राणघातक वादळ थांबण्याची वाट पाहत आहेत. चक्रीवादळाने 25 वर्षांपूर्वी केलेलं मृत्यूचं तांडव, गुजरातला मोठा तडाखा; आता बिपरजॉयचा धोका हा व्हिडिओ @el_karadepapa या ट्विटर वापरकर्त्याने पोस्ट केला आहे. आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. ही घटना कुठे घडली हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, या व्हिडिओचा चक्रीवादळ बिपरजॉयशी काही संबंध नाही.