JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO: ज्या विमानातून आई-वडील करत होते प्रवास, तेच प्लेन उडवत होता मुलगा; अचानक समोरासमोर आले अन्..

VIDEO: ज्या विमानातून आई-वडील करत होते प्रवास, तेच प्लेन उडवत होता मुलगा; अचानक समोरासमोर आले अन्..

एअर अरेबियात काम करणाऱ्या या वैमानिकाने आपल्या पालकांच्या चेहऱ्यावर मोठं हसू आणलं. आता तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल की मुलाने असं नेमकं काय केलं?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 24 जुलै : प्रत्येक मुलाची अशी इच्छा असते की जगातील प्रत्येक आनंद आपल्या आई-वडिलांना देता यावा. मुलांना हे दाखवायचं असतं की आता तो सक्षम आहे जो त्यांना आनंदी ठेवू शकतो आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतो. आपल्या पालकांना आपला अभिमान वाटावा, असं मुलांना नेहमी वाटतं आणि यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात. असंच काहीसं सध्या समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. ज्यात एक मुलगा अचानक त्याच्या पालकांना फ्लाइटमध्ये भेटला. एअर अरेबियात काम करणाऱ्या या वैमानिकाने आपल्या पालकांच्या चेहऱ्यावर मोठं हसू आणलं. आता तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल की मुलाने असं नेमकं काय केलं? पायलटने त्याच्या आई-वडिलांना राजस्थानातील जयपूर येथील त्यांच्या घरी नेलं. पालक या फ्लाइटमध्ये चढले पण त्यांचा मुलगाच हे विमान उडवणार आहे, हे त्यांना माहीत नव्हतं. ऐन प्रवासात संपलं विमानातलं इंधन; पायलट-क्रू सह प्रवाशांना फुटला घाम, पुढे काय झालं? पायलट कमल कुमार यांनी ही संपूर्ण घटना आपल्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला पायलटची आई विमानात प्रवेश करते आणि समोर आपल्या मुलांना बघते. ती थोडावेळ थांबते आणि मुलाचा हात धरून आनंदाने हसते. या क्लिपमध्ये वैमानिक त्याच्या कुटुंबीयांसह कॉकपिटमध्ये बसल्याचे फोटोही दाखवले आहेत. व्हिडिओमध्ये असं लिहिलं आहे की, ‘फ्लाइटमध्ये येताच कुटुंब आश्चर्यचकित झालं आणि त्यांना घरी घेऊन जात आहे.’

संबंधित बातम्या

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं, जेव्हापासून मी वैमानिक म्हणून काम सुरू केलं, तेव्हापासून या क्षणाची वाट बघत होता आणि अखेर आज मला त्यांना जयपूरला घरी परत घेऊन जाण्याची संधी मिळाली. ही खूपच खास फिलिंग आहे. प्रेमाला वय नाही; भर पावसातील पुण्याच्या ‘या’ ज्येष्ठ जोडप्याचा VIDEO पाहून सर्वच इमोशनल इंस्टाग्रामवर या क्लिपला आतापर्यंत 1 लाख 41 हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि अजूनही अनेकजण पोस्ट लाईक करत आहेत. लोकांनी कमेंट बॉक्समध्येही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि हा व्हिडिओ त्यांना किती आवडला हे शेअर केलं. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, ‘प्रत्येक पायलटचे स्वप्न.’ दुसर्‍या यूजरने लिहिलं, ‘आतापर्यंतची सर्वोत्तम भावना.’ तिसऱ्या यूजरने लिहिलं, ‘आजही तो दिवस आठवतो जेव्हा आई पहिल्यांदा फ्लाइटमध्ये बसली होती. ही एक अद्भुत गोष्ट आहे.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या