जाहिरात
मराठी बातम्या / Viral / ऐन प्रवासात संपलं विमानातलं इंधन; पायलट-क्रू सह प्रवाशांना फुटला घाम, पुढे काय झालं?

ऐन प्रवासात संपलं विमानातलं इंधन; पायलट-क्रू सह प्रवाशांना फुटला घाम, पुढे काय झालं?

ऐन प्रवासात संपलं विमानातलं इंधन; पायलट-क्रू सह प्रवाशांना फुटला घाम, पुढे काय झालं?

सध्याच्या काळात विमान प्रवासाला (Air Travel) जास्त पसंती दिली जाते. विमान प्रवास सोयीचा तर असतोच; पण त्यामुळे बराच वेळ वाचतो. विमान प्रवास जितका सोयीस्कर आहे तितकाच धोकादायकही आहे. त्यामुळेच विमान उड्डाण करण्यापूर्वी त्याची कसून तपासणी केली जाते.

  • -MIN READ Trending Desk Viralimalai,Pudukkottai,Tamil Nadu
  • Last Updated :

    मुंबई, 24 जुलै : सध्याच्या काळात विमान प्रवासाला (Air Travel) जास्त पसंती दिली जाते. विमान प्रवास सोयीचा तर असतोच; पण त्यामुळे बराच वेळ वाचतो. विमान प्रवास जितका सोयीस्कर आहे तितकाच धोकादायकही आहे. त्यामुळेच विमान उड्डाण करण्यापूर्वी त्याची कसून तपासणी केली जाते. थोडासा निष्काळजीपणा सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना (Crew Members) महागात पडू शकतो. अशा स्थितीत एखाद्या विमानाचा इंधनाचा (Fuel) अंदाज कोणत्याही विमान कंपनीकडून चुकला तर? प्रवाशांनी भरलेल्या विमानाचं इंधन ऐन प्रवासातच संपलं तर काय होईल? जगातली कोणतीही विमान कंपनी (Airline Company) अशी चूक करू शकत नाही, असं तुम्हाला वाटत असेल; पण प्रत्यक्षात नुकतंच असं एक प्रकरण समोर आलं आहे. एक विमान कंपनी आपल्या विमानाच्या इंधनाचा अंदाज घेण्यास चुकली आणि विमानातलं इंधन आकाशातच संपलं. ही बाब लक्षात येताच सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना अक्षरशः घाम फुटला. परिणामी विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. परंतु, विमानाचं इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing) होईपर्यंत या गोष्टीचं नेमकं कारण काय हे प्रवाशांना माहिती नव्हतं. विमानात इंधन कमी आहे, ही बाब प्रवाशांना विमानातून सुखरूप उतरल्यावर समजली. तोपर्यंत प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं. इमर्जन्सी लॅंडिंग करावं लागलं ही घटना 20 जुलै रोजीची असल्याचं सांगितलं जात आहे. एअर लिंगस (Aer Lingus) जेटचं घाईघाईत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. हे विमान डब्लिनला जाणार होतं. इंधन संपल्यानं ते मध्यरात्री लिमेरियकला उतरवण्यात आलं. विमानाचं लँडिंग झाल्यानंतर अनेक प्रवाशांनी (Passengers) त्यांचा भयानक अनुभव सर्वांसोबत शेअर केला. या इमर्जन्सी लँडिंगची माहिती समजल्यानंतर अनेक प्रवाशांची तारांबळ उडाली. प्रवाशांनी शेअर केला भयावह अनुभव या विमानातून उतरलेल्या एका प्रवाशानं `द सन`शी बोलताना सांगितलं, `हा खूप भीतिदायक अनुभव होता. सर्व प्रवासी खूप घाबरले होते. विमानाचं इमर्जन्सी लँडिंग का केलं जातंय, हे कोणालाच समजत नव्हतं. प्रवाशांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. त्यातच विमानात इंधन कमी असल्याचं मला समजलं आहे, असं एका व्यक्तीनं सांगितलं. परंतु, इंधन संपलंय ही गोष्ट विमानातून उतरल्यावर कन्फर्म झाली.` `ही विमान कंपनी निकृष्ट सेवेसाठी ओळखली जाते. कधी विमान उड्डाणाला उशीर होतो, तर कधी अन्य काही समस्या असतात. आता इंधन संपण्याच्या घटनेनं सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत,` असं अन्य एका प्रवाशानं सांगितलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात