मालकानेच दुचाकी चोराला पकडलं
नवी दिल्ली 10 मे : भारतात क्वचितच कोणी असेल ज्याने गाडी चोरीच्या घटना ऐकल्या नाहीत. दर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी वाहन चोरीच्या तक्रारी नोंदवल्या जातात. मात्र, असे काही चोर आहेत जे तुमच्या ऑफिस किंवा घराबाहेरून वाहने चोरतात आणि मग मालकालाच रिकाम्या हाती घरी परतावं लागतं. शिवाय, दुचाकींचा विचार केला तर, आपल्या देशातील बहुतांश घटनांमध्ये पोलिसही एफआयआर नोंदवण्याची तसदी घेत नाहीत. काही प्रकरणांमध्ये वाहने चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर लोकांना त्यांची वाहनं परत मिळतात. तर काहींना आपली वाहनं परत कधीच मिळत नाहीत. काही भाग्यवान लोक असेही आहेत जे स्वत: चोर पकडण्यात यशस्वी होतात. असंच एक उदाहरण केरळमधून समोर आलं आहे, जिथे चोरट्याने चोरीची दुचाकी पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी नेली. अन् तिथेच दुचाकीच्या मालकाला त्याची चोरी झालेली गाडी परत मिळाली. हा संपूर्ण प्रकार पंपावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ कन्नड इन्फो लाइट या यूट्यूब चॅनलने शेअर केला आहे, जो कथितपणे एका मल्याळम वृत्तवाहिनीवरून घेण्यात आला आहे. महिलेनं मागवला 25 हजार रुपयांचा केक, पण पाहून खायची हिंमतच झाली नाही; कारण… मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोझिकोड जिल्ह्यातील कडलुंडी गावचे पंचायत सदस्य प्रवीण यांची मोटारसायकल गेल्या शनिवारी कोझिकोड शहरात चोरीला गेली. दुसऱ्या दिवशी प्रवीण चोरीची तक्रार देण्यासाठी जवळच्या पोलीस ठाण्यात गेले, मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना चोरीच्या मोटरसायकलची मूळ कागदपत्रे देण्यास सांगितले. मूळ कागदपत्रे घेण्यासाठी प्रवीण आणि त्याचे मित्र कडलुंडी येथील त्याच्या घरी गेले.
व्हिडिओमध्ये प्रवीणच्या मित्राची कार इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपाकडे जात असल्याचं दिसतं. तेव्हा त्याला अचानक चोरी झालेली दुचाकी दिसली. पेट्रोल पंपावर प्रवेश करताच एका मोटारसायकलने त्यांना डाव्या बाजूने ओव्हरटेक केलं आणि पेट्रोल पंपावर पोहोचली. प्रवीणच्या लक्षात आलं, की ही बाईक खरोखर त्याची चोरीची मोटरसायकल होती, एक स्वार हेल्मेट घातलेला होता आणि एक मागे बसला होता. त्याने ताबडतोब त्याच्या मित्रांना सावध केलं आणि ते चोराला पकडण्यासाठी तयार झाले. धोका ओळखून प्रवीण आणि त्याच्या मित्रांनी येऊन आधी दुचाकी पकडली, मात्र संधी मिळताच चोर तात्काळ गाडीवरुन खाली उतरला आणि तेथून फरार झाला. ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोर हेल्मेट न काढता पळून गेला, त्यामुळे व्हिडिओ फुटेजमध्ये त्याची ओळख पटवणं कठीण झालं आहे.