प्रतिकात्मक फोटो
कानपूर : आपल्या लग्नासाठी प्रत्येक मुलगा किंवा मुलगी खुपच उत्साही असतो. लग्नानंतर आपल्याला हक्काचं माणूस मिळेल आणि आनंदी जिवन जगू असं सगळेच विचार करतात. लोक आपल्या लग्नासाठी आनंदी असतात आणि असंख्य स्वप्न पाहाता. पण एका लग्नात काही भलताच प्रकार पाहायला मिळाला. खरंतर येथे एका लग्नात एका वधूशी लग्न करण्यासाठी दोन नवरदेवांची वरात दारात आली होती. हा धक्कादायक प्रकार कानपुरमध्ये घडला. या दोन्ही वरातींमध्ये फरक एवढाच होता की एक वर त्याच्या कुटुंबीयांसह आणि नातेवाईकांसह पोहोचला होता तर दुसरा यूपी पोलिसांसह आला होता. यानंतर मात्र तेथे मोठा गोंधळ उडाला. इथे आपल्याच वडिलांशी लग्न करतात मुली, कुठे आहे अशी विचित्र परंपरा? शैलेंद्र प्रजापती यांच्या मुलीचे लग्न चौबेपूर येथे राहणाऱ्या उमेशसोबत निश्चित झालं होतं. 27 फेब्रुवारीला उमेश वराड्यांसह गेस्ट हाऊसवर पोहोचला. तेवढ्यात वधूचे वडील शैलेंद्र यांना फोन आला, ज्यानंतर ते आणि त्याचे कुटुंबीय यांना आश्चर्याचा धक्का बसला. वधूच्या वडिलांना फोनवर सांगण्यात आले की, ज्योती ही फक्त माझी आहे आणि तिचे लग्न इतर कोणाशीही होऊ शकत नाही. ती माझी पत्नी आहे, हा फोनवरचा मेसेज ऐकून सर्वांची तारांबळ उडाली. लग्नासाठी नवरा-बायकोच्या वयात किती अंतर असावं? काही वेळाने अकबरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक हे दुसरा नवरदेव रामाशिषसोबत गेस्ट हाऊसवर पोहोचले आणि लग्न थांबवले. पोलिस थेट वधूच्या वडिलांपर्यंत पोहोचले आणि सांगतले की तुमच्या मुलीचे आधीच लग्न झाले आहे, तिच्या पहिल्या पतीने पोलिसांना 112 वर फोन केला आणि सांगितले की त्याच्या बायकोचे दुसरे लग्न ठरले आहे. पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीने आपले नाव रामाशीष असे सांगितले आहे. आर्य समाज मंदिरात त्याने ज्योतीशी लग्न केल्याचे त्याचे म्हणणे आहे. रामाशीष हा लखनऊचा रहिवासी असल्याचे सांगण्यात आले, तो सोशल मीडिया आणि शादी डॉट कॉमच्या माध्यमातून ज्योतीला भेटला. त्यानंतर दोघे प्रेमात पडले आणि 5 महिन्यांनंतर दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर त्यांनी आर्य समाज मंदिरात लग्न केले आणि आपापल्या घरी आरामात राहू लागले. दरम्यान, ज्योतीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसरीकडे लावण्याचे ठरवले, म्हणून त्याने तुमच्या विरोधातही तक्रार केली आहे. यानंतर परिस्थीती संपूर्ण बदलली नववधू जोरजोरत रडू लागली आणि तिने पोलिसांना सांगितले की तिने दबावामुळे रामाशीशसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिने सांगितले की, “रामशीश मला ब्लॅकमेल करायचा आणि मी माझ्या घरच्यांना सांगू शकत नव्हतो.” तर ज्योतीचा प्रियकर रामशीशने सांगितले की, “ज्योतीचे ज्या मुलाशी लग्न ठरले होते, त्या मुलाला आमच्याबद्दल सांगितले होते आणि सर्व काही माहीत असतानाही उमेश ज्योतीशी लग्न करण्याबाबत बोलत होता, त्यानंतर मी पोलिसांची मदत घेतली.”
या सगळ्या गदारोळात उमेश आणि त्याचे कुटुंबीय अखेर वधूला न घेताच आपल्या घरी परतले. त्यानंतर वधूच्या वडिलांनी मुलीचे लग्न तिच्या प्रियकराशी आणि पहिल्या पतीसोबत करुन दिले आणि रामाशीषने वधूला घरी नेले.