JOIN US
मराठी बातम्या / Viral / अद्भुत! रंग बदलणारा Octopus पाहिलात का? कॅमेऱ्यात कैद झाला निसर्गाचा चमत्कार

अद्भुत! रंग बदलणारा Octopus पाहिलात का? कॅमेऱ्यात कैद झाला निसर्गाचा चमत्कार

सरड्याप्रमाणे रंग बदलणारा ऑक्टोपस पाहून डोळ्यांवरही विश्वास बसत नाही आहे.

जाहिरात

सरड्याप्रमाणे रंग बदलतो आहे ऑक्टोपस

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 ऑगस्ट : रंग बदलणारा सरडा आपल्याला सर्वांना माहितीच आहे. ठिकाणानुसार आपल्या बचावासाठी सरडा रंग बदलतो. आता असाच रंग बदलणारा ऑक्टोपस (Octopus) दिसला आहे. ऑक्टोपस रंग बदलतानाचा (Octopus changing colors in her sleep) सुंदर दृश्य कॅमेऱ्यात कैद झाला आहे. निसर्गाचा हा अद्भुत असा चमत्कारच म्हणावा लागेल. ऑक्टोपसचे बरेच व्हिडीओ (Octopus video)  तुम्ही पाहिले असतील. पण सध्या जो व्हिडीओ (Viral video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे, तो तुम्ही कदाचित पहिल्यांदाच पाहत असाल. व्हिडीओ पाहूनच तुम्ही हैराण व्हाल.

संबंधित बातम्या

Buitengebieden ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा ऑक्टोपस झोपेत आपला रंग बदलताना दिसतो आहे. हे वाचा -  आईच्या डोळ्यादेखत पिल्लाला जबड्यात धरून बिबट्या पसार; मन हेलावणारा VIDEO व्हिडीओत पाहू शकता सुरुवातील हा ऑक्टोपस पांढराशुभ्र आहे. त्यानंतर हळूहळू त्याचा रंग पिवळा होतो. मध्येच हिरवा होतो. पाहता पाहता हा पांढरा ऑक्टोपस कलरफूल बनतो.  फक्त रंगच नाही तर ऑक्टोपस आपला आकारही बदलताना दिसतो आहे. मध्येच त्याच्या शरीरावर स्पाइक म्हणजे काट्यासारखी रचना झाल्याचंही दिसतं. हे वाचा -  हत्तीनं काही सेकंदातच उपटलं भलंमोठं झाड; गजराजची अफाट ताकद दाखवणारा VIDEO रंग बदलणारा ऑक्टोपस पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटतं आहे. ऑक्टोपससुद्धा रंग बदलतो यावर कुणाचाच विश्वास बसत नाही आहे. व्हिडीओ प्रत्यक्षात पाहून आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसत नाही आहे. बहुतेकांना हे स्वप्न वाटतं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या