JOIN US
मराठी बातम्या / Viral / Oh No! LIVE TV वर नको त्या अवस्थेत दिसली अँकर; VIDEO VIRAL, तोंड दाखवणंही मुश्किल झालं

Oh No! LIVE TV वर नको त्या अवस्थेत दिसली अँकर; VIDEO VIRAL, तोंड दाखवणंही मुश्किल झालं

लाइव्ह टीव्हीवर न्यूज अँकरचं असं कृत्य कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं की ते पाहून तिलाही धक्का बसला.

जाहिरात

अँकरचा व्हिडीओ व्हायरल.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 05 मे : टीव्हीवर बातम्या देणाऱ्या अँकरना खूप सतर्क राहावं लागतं. त्यांची छोटीशी चूकही झाली तर त्यांचा हा लाइव्ह व्हिडीओ व्हायरल होतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. लाइव्ह टीव्हीवर एक महिला अँकर नको त्या अवस्थेत दिसली. ती असं काही करताना कॅमेऱ्यात कैद झाली की तिचा व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला. किंबहुना जेव्हा तिने स्वतः हा व्हिडीओ पाहिला तेव्हा तिलाही तोंड दाखवणं मुश्किल झालं. एका टीव्ही अँकरने लाइव्ह टीव्हीवर मोठी चूक केली आहे. लाइव्ह बातम्या देत असताना तिने असं काही केलं की ते पाहिल्यानंतर तिनेही शरमेने आपली मान खाली घातली. आपलं ऑनस्क्रिन ते दृश्य पाहून तिचे डोळे मोठे झाले, तोंड उघडं राहिलं. लगेच तिने आपली मान खाली झुकवली. कुणाला नजर मिळवण्याचीही तिची हिंमत झाली नाही. प्री-वेडिंगमध्ये कपलला रोमँटिक पोझ दाखवताना कॅमेरामॅननी मारला चान्स; लाजिरवाण्या कृत्याचा VIDEO व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, महिला टीव्ही अँकर सुरुवातीला बातमी सांगते. त्यानंतर त्या बातमीचं दृश्य दाखवलं जातं. समोर एक व्हिडीओ दिसते. जशी बातमी संपते तसं ते दृश्य हटतं आणि पुन्हा अँकर दिसते. त्यावेळी ती चक्क आपले दोन्ही हात वर करून जांभई देत असते, आळस काढत असते. तिने स्वतःला अशा अवस्थेत तिथंच पाहिलं आणि तिलाही लाज वाटली. स्वतःला लाइव्हमध्ये असं हात वर करून पाहताच तिने लगेच आपले हात खाली घेतले आणि ती थोडा वेळ शांतच झाली. आपल्याकडून मोठी चूक झाली हे तिच्या लक्षात आलं. त्यामुळे तिने आपली मान, नजरही खाली झुकवली. पण तरी तिने स्वतःला कसंबसं सावरलं आणि पुढची बातमी ती वाचू लागली. Watch Video : भरमंडपात नवरदेवाची गेली इज्जत, पुढे घडलेला प्रकार पाहाण्यासारखा @brexit_sham या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. बहुतेक युझर्सनी अँकरची बाजू सांभाळून घेतली आहे. लाइव्ह टीव्हीचं दृश्य आहे, अशा चुका होतात, प्रत्येक जण अशी चूक करतो. असं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या