प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)
जिनिव्हा, 17 मे : जगाच्या अंताच्या अफवा वेळोवेळी उडत राहतात. कधी पृथ्वीला उल्कापिंड धडकणार, कधी त्सुनामीमुळे पृथ्वी बुडणार, असे अलर्ट तुम्ही अनेकदा ऐकले असतील. आता सोशल मीडियावर अनेक लोक स्वतःला टाईम ट्रॅव्हलर्स म्हणवूनही भविष्यासंबंधित दावे करतात. त्यांनीही जगाच्या नाशाबाबत सांगितलं आहे. मात्र आतापर्यंतचे त्यांचे सर्व अंदाज खोटे ठरले आहेत. पण आता मात्र नासाने जगाच्या अंताबाबत अलर्ट दिला आहे, ज्यामुळे सर्वांना धडकी भरली आहे. नासा अवकाशातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवते. कोणता ग्रह फिरतोय, कोणता खडक पृथ्वीच्या जवळ येतोय या सर्व गोष्टींवर नासा लक्ष ठेवते. नासा वेळोवेळी अनेक प्रकारचे इशारेही देते. नासाने नुकतीच केलेली नवीन घोषणा समजल्यानंतर लोकांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.
नासाने खुलासा केला आहे कीस जेव्हा पृथ्वीवर मोठं संकट येईल तेव्हा लोकांकडे फक्त अर्धा तास असेल. म्हणजेच, कोणताही अंदाज लोकांना त्यांचे प्राण वाचवण्यास मदत करणार नाही. NASA अंतराळात पाठवणार साप; आहे खास कारण, करणार मोठं काम त्यांच्या मते, अंतराळात एक वादळ येईल, जे पृथ्वीला आपल्या विळख्यात घेईल. या सौर वादळामुळे पृथ्वीवर ज्वाळा उठतील. माणसाला या होलोकॉस्टमधून सुटण्याची संधीही मिळणार नाही. या वादळाला पृथ्वीवर पोहोचायला फक्त अर्धा तास लागणार आहे. म्हणजे इतक्या कमी वेळात पृथ्वीचा नाश होईल. अंतराळ एजन्सी एआय मॉडेलच्या मदतीने विनाशाबद्दल सर्व तपशील काढत आहे. याद्वारे धोक्याची यंत्रणा कशी विकसित करता येईल यावर काम सुरू आहे. नासा या तंत्रावर काम करत आहे की जेव्हा हे वादळ अंतराळातून उद्भवते तेव्हा त्याची माहिती पृथ्वीवर लवकर पोहोचते. यासाठी अनेक उपग्रह कामाला लागले आहेत. NASA ने बांधला ‘मंगळावरील बंगला’; Mars वरील घराचे INSIDE PHOTO परंतु आतापर्यंत असे दिसून आले आहे की जेव्हा अवकाशात वादळ येते तेव्हा ते उपग्रह सिग्नल देणं बंद करतात. पण आता AI च्या मदतीने कदाचित या समस्येवर उपाय सापडेल.