पृथ्वीशिवाय आणखी कोणत्या ग्रहावर माणूस राहू शकतो, याचा शोध कित्येक वर्षांपासून सुरूच आहे. यात सर्वात आधी कोणत्या ग्रहाचं नाव येतं तर तो आहे मंगळ. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य - Canva)
मंगळावर लवकरच काही माणसं राहायला जाणार आहेत आणि त्याची तयारीही सुरू झाली आहे. नासाने आता मंगळावरील बंगला बांधला आहे. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य - Canva)
मंगळ ग्रहावर माणूस कसा राहिल, तिथं घर कसं असेल? याचा नमुना नासाने दाखवला आहे. या घराचे इनसाइड फोटो नासाने सर्वांसमोर आणले आहे. (फोटो सौजन्य - Reuters)
हे घर प्रत्यक्षात मंगळावर नाही तर हे पृथ्वीवर आहे. मंगळ ग्रहावर जाणाऱ्या अंतराळविरांच्या प्रॅक्टिससाठी, अनुभवासाठी नासाने पृथ्वीवर हे घर तयार केलं आहे. (फोटो सौजन्य - Reuters)