प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 10 जून : प्रत्येक पालकांचं आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम असतं. ते आपल्या मुलांसाठी वाटेल ते करण्याची तयारी दाखवतात. आजकालचे पालक तर शिक्षकांना देखील आपल्या मुलांवर ओरडू देत नाहीत किंवा त्यांना शिक्षा म्हणून मारण्याची परवानगी देत नाहीत. तसेच ते आपल्या पाल्याची गरजेपेक्षा जास्त काळजी घेताना दिसतात. यासगळ्यात एक छोटासा निष्काळजीपणा हा एक मोठा अपघात होण्यासाठी पुरेसं असतं, हे दाखवून देणारी एक दुर्दैवी घटना घडली आहे. जिथे आईच्या रोजच्या सवयीमुळे एका चिमुकलीनं आपले प्राण गमावले आहे. डॉक्टरांची एक चुक आणि वडिलांनी डोळ्यासमोर पाहिला आपल्या नवजात बाळाचा मृत्यू हा प्रकार स्कॉटलंडमधील आहे. येथे एका आईने घराच्या दारात पिशवी टांगली होती. पण ही पिशवी तिच्या चौदा महिन्यांच्या चिमुरडीसाठी मृत्यूचा सापळा ठरेल याची तिने कल्पनाही केली नव्हती. दारात लटकलेल्या पिशवीमुळे चौदा महिन्यांच्या मिया माकपीचा मृत्यू झाला. खेळता खेळता पिशवीच्या पट्ट्यात मुलीची मान अडकली. तेव्हा गुदमरल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना 24 मे ची आहे. मृत्यू झालेल्या मुलीचे वय अवघे 14 महिने होते. आई-वडिलांच्या चुकीमुळे तिला आपला जीव गमवावा लागला. भारतातही बहुतेक लोक असंच करतात, त्याप्रमानेच या मुलीच्या आईनेही केले. पण तिला कुठे ठावूक होतं की त्याची तिला इतकी मोठी शिक्षा भोगावी लागणार आहे. 9 सेकंदात मृत्यूचा तांडव, बाईक स्टंट करताना एक चुक आणि… पाहा Video या जोडप्याने सांगितले की, सहसा ते दाराच्या हँडलला अनेक गोष्टी लटकवतात, त्याचप्रमाणे त्यांनी एक पिशवीही टांगली होती. पण हा आपल्या मुलीसाठी मृत्यूचा सापळा ठरेल याची कल्पनाही केली नव्हती. इतर पालकांनी अशी चूक करू नये, अशी विनंती त्यांनी केली.