JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO - मांजरासाठी माकडाचीही विहिरीत उडी, वाचवण्यासाठी धडपड केली पण...; डोळ्यात पाणी आणणारा शेवट

VIDEO - मांजरासाठी माकडाचीही विहिरीत उडी, वाचवण्यासाठी धडपड केली पण...; डोळ्यात पाणी आणणारा शेवट

माकड आणि मांजराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

जाहिरात

माकड आणि मांजराचा व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 एप्रिल :  शक्यतो प्राणी एकमेकांची शिकार करताना दिसतात. सोशल मीडियावरही असेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओने मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण यात प्राणी प्राण्याचा जीव घेताना नव्हे तर जीव वाचवताना दिसला आहे. एका माकडाने मांजराचा जीव वाचवण्यासाठी धडपड केली आहे. मांजर आणि माकडाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. माकड म्हणजे दुसऱ्यांची खोड काढणारं. त्याच्यात खोडकरपणा जास्त असतो. त्यामुळे असं माकड कुणाच्या मदतीसाठी धावून जाऊ शकतो, याचं थोडं आश्चर्यच वाटेल. पण असं घडलं आहे. एक मांजर एका विहिरीत पडलं. त्याच्या मदतीसाठी एक माकड धावून आलं. मांजराला वाचवण्यासाठी माकडानेही विहिरीत उडी मारली. मांजराला विहिरीबाहेर काढण्यासाठी माकडाने शेवटपर्यंत धडपड केली. पण तोसुद्धा मांजरासोबत विहिरीत अडकला. मांजराला घेऊन त्याला विहिरीबाहेर पडताच येईना.

पण तरी त्याने हिंमत सोडली नाही. हा व्हिडीओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. VIDEO - रस्त्यात आडवा आला बिबट्या, चवताळला हत्ती; पुढे जे घडलं ते पाहून विश्वास बसणार नाही व्हिडीओत तुम्ही पाहू शकता विहिरीतून मांजराचा आवाज ऐकून माकड त्या विहिरीच्या कठड्यावर जातं. आत चिखल दिसतो. त्या चिखलात मांजर आहे. तिला बाहेर पडता येत नाही आहे. मांजराला संकटात पाहून माकडाने मागचा पुढचा कोणताही विचार न करता स्वतःही त्या विहिरीत उडी मारली. तिला आपल्याजवळ घेतलं आणि वर उडी मारण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला ते काही जमेना. तो एकटा विहिरीबाहेर येऊ शकत होता पण मांजराला घेऊन नाही. त्याने विहिरीबाहेर येत आपल्या एका साथीदाराकडे म्हणजे दुसऱ्या माकडाकडे मदतही मागितली. पण त्या माकडाने मदत न करता तिथून पळ काढला. शेवटी ते माकड पुन्हा विहिरीत गेलं आणि पुन्हा प्रयत्न करू लागलं. बापरे! बोटांच्या चिमटीत राहिल इतका, पण त्याने जिवंत माणसाला खाल्लं; तुमच्याही घरात राहतोय हा कीटक व्हायरल व्हिडिओ: मांजर पडलं होतं विहिरीत, माकडानं मिळून वाचवला जीव, सुखरूप बाहेर काढलं. अखेर एक महिला तिथं आली आणि तिने त्या दोघांनाही विहिरीतून बाहेर काढलं. त्यानंतर माकड मांजराला घेऊन त्याच विहिरीच्या कठड्यावर बसलं. मांजराला त्याने आपल्या कुशीत घट्ट धरलं. मांजर चिखलाने माखलं होतं. त्याला स्वच्छ करण्यासाठी महिला त्या मांजराला आपल्याजवळ घेत होती. पण माकडाने तिला सोडलं नाही. मांजराला घट्ट मिठी मारून ते तसंच बसलं.

संबंधित बातम्या

@TansuYegen ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अवघ्या दीड मिनिटांच्या या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या