JOIN US
मराठी बातम्या / Viral / रोमान्सनंतर मेट्रोत आता माकडचाळे! ट्रेनमध्ये घुसून माकडाने काय केलं पाहा VIDEO

रोमान्सनंतर मेट्रोत आता माकडचाळे! ट्रेनमध्ये घुसून माकडाने काय केलं पाहा VIDEO

मेट्रो ट्रेनमध्ये माकड घुसलं, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जाहिरात

दिल्ली मेट्रोत माकड (फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 27 मे : काही दिवसांपूर्वी मेट्रो त कपलच्या रोमान्सचे व्हिडीओ व्हायरल होत होते. याच मेट्रोत आता कपलच्या रोमान्सनंतर माकडाचे चाळे पाहायला मिळाले आहेत. मेट्रोत चक्क माकड घुसलं आहे. मेट्रोत घुसून माकडाने असं काही केलं की पाहणारा प्रत्येक जण थक्क झाले आहे. मेट्रोत माकडाला पाहून मेट्रोतील प्रवाशीही स्तब्ध झाले. मेट्रोतील या माकडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. मेट्रोतील दररोज काही ना काही नवे वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कुणी नको तसं कपडे घालून येतं, तर कधी कुणी अश्लील चाळे करताना दिसलं. गेले काही दिवस दिल्ली मेट्रो तर अशाच कारणांमुळे चर्चेत आली आहे. आता पुन्हा दिल्ली मेट्रो चर्चेत आली आहे, याचं कारण आहे ते एक माकड. दिल्ली मेट्रोत माकड घुसलं आहे.

मेट्रोतील माकडाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातीला माकड मेट्रोतील एका खांबावर दिसतं आहे. खांबावर चढून ते पोल डान्स करतं आहे. त्यानंतर ते खाली उतरतं आणि मेट्रोभर फिरतं. VIDEO - मांजरासाठी माकडाचीही विहिरीत उडी, वाचवण्यासाठी धडपड केली पण…; डोळ्यात पाणी आणणारा शेवट थोड्या वेळाने एका प्रवाशाशेजारी जाऊन बसतं. एक रिझर्व्ह सीट माकड बळकावतं. शेजारी बसलेल्या प्रवाशाच्या पायावर हात ठेवतं. प्रवाशीही घाबरलेला दिसतो आहे. पण माकडाचा हात आपल्या पायावरून काढून त्याच्यापासून दूर पळण्याची हिंमतही त्याच्या नाही. त्याच्या चेहऱ्यावर ही भीती स्पष्ट दिसतं. त्यानंतर माकड सीटवर उभं राहून खिडकीतून बाहेरचं दृश्य पाहतो.  पण माकड अगदी शांत आहे. तसं ते थोडेफार माकडचाळे करतं आहे पण त्यामुळे कुणाला त्रास होत नाही आहे. ते मुद्दामहूनही कुणाला त्रास देत नाही आहे. अगदी मेट्रो प्रवासाचा ते आनंद लुटताना दिसतं आहे. टेडी बियरच्या स्वरूपात वानराच्या पिल्लाला आईच मातृत्व; निर्जीव बाहुल्याचा लागला लळा @anuragminusverma इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने लााखो वर्षांपूर्वीचा इतिहास एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळाला, असं वाटत असल्याचं म्हटलं. तर एकाने बिच्चारं आपल्या कुटुंबापासून दूर झालं, आता पुन्हा कसा जाणार? अशी माकडाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या

मेट्रोत माकडाला पाहून तुम्हाला काय वाटलं?, तुमची प्रतिक्रिया आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या