फोटो - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब
नवी दिल्ली, 26 जुलै : झाडं लावा, झाडं जगवा, असं सांगितलं जातं. झाडांबाबत अशी बरीच घोषवाक्ये आहेत. खरंच झाडांमुळेच आपल्याला ऑक्सिजन मिळतो, पाऊसही झाडांमुळेच पडतो. अशी कितीतरी झाडं आहेत आणि प्रत्येक झाडांचे फायदेही वेगवेगळे आहेत. या फायद्यांनुसारच काही झाडं आपण आपल्या घरात, काही बाल्कनीत तर काही घराबाहेर किंवा घराच्या जवळ लावतो. पण एक असं झाड ते तुम्हाला त्सुनामी-चक्रीवादळापासूनही वाचवू शकतं. याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. फळं देणारं, फुलं देणारं, ऑक्सिजन देणारं, डासांना दूर ठेवणारं, औषधी झाडं… अशी कितीतरी झाडं तुम्हाला माहिती असतील. पण कधी त्सुनामी-चक्रीवादळापासून वाचवणाऱ्या झाडाबाबत तुम्ही ऐकलं आहे का? हे वाचूनत तुम्हाला आश्चर्य वाटले. एका भारतीय वन अधिकाऱ्यानेच या झाडाचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात हे झाड कशापद्धतीने या नैसर्गिक आपत्तीपासून वाचवू शकते, हे दाखवलं आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका काचेत झाड दिसतं आहे. त्यातच पाणीही आहे. झाडांच्या एका बाजूने असलेल्या पाण्यात लाटा उसळताना दिसत आहेत. पण झाडांच्या दुसऱ्या बाजूला असलेलं पाणी मात्र स्थिर आहे. पाण्याची ही लाट म्हणजे त्सुनामी. त्सुनामी आल्यावर अशा लाटा येतात. पण हीच त्सुनामी या झाडांनी रोखली आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजूकडील पाण्यावर त्याचा काहीच परिणाम नाही. OMG! भारतात दिसलं स्वर्गाचं द्वार? आकाशातील रहस्यमयी दरवाजा पाहून सर्व हैराण; अद्भुत VIDEO VIRAL ही छोटी झाडं मॅनग्रोव्ह्ज म्हणजे खारफुटीची झाडं आहेत. आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. कासवान यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. खारफुटी हे निसर्गाचे स्वतःचे आपत्ती व्यवस्थापक आहेत. हे समजून घेण्यासाठी फक्त हा 20 सेकंदाचा व्हिडिओ पाहा. खारफुटी त्सुनामी, चक्रीवादळांपासून आपले संरक्षण कसे करतात. जेव्हा त्सुनामी आली आणि पाण्याच्या लाटा उसळू लागल्या तेव्हा या खारफुटीच्या जंगलांनी आपली धार कशी कमकुवत केली, हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्यांना पुढे जाण्यापासून रोखले. व्हिडिओ पाहून तुम्हाला ते नीट समजेल. खारफुटीच्या जंगलाजवळ येताच लाटा कशा शांत होतात. डच संशोधन संस्थेने हा व्हिडिओ तयार केला आहे. आर्टिस्ट डुक्कर! काढली अशी पेटिंग्स, खरेदीसाठी गर्दी; किंमत तब्बल 10 कोटी जगातील बहुतेक झाडे खाऱ्या पाण्यात नष्ट होतात, पण याच पाण्यात खारफुटीची भरभराट होते. कमी ऑक्सिजनच्या परिस्थितीतही ही झाडं जगू शकतात. त्यांची दाट मुळे माती धरून ठेवण्यास मदत करतात. जमिनीवरील मुळे पाण्याचा प्रवाह कमी करतात, ज्यामुळे त्सुनामीचा प्रभाव कमी होतो. काही खारफुटी त्यांच्या पानांवरील छिद्रांद्वारे ते खारे पाणी फिल्टर करतात. ते प्रदूषणही कमी करतात.
कासवान यांनी ते कसे कार्य करतात हे स्पष्ट केले? ते म्हणाले, खारफुटी एक चक्रव्यूह आणि घनदाट अधिवास तयार करतात. ते बफरसारखे कार्य करतात आणि वाऱ्याचा वेग कमी करतात. तुम्ही ‘थिअरी ऑफ कंपन’ मध्येही हेच वाचले असेल. त्याच प्रकारे ते वादळांना पुढे जाण्यापासून रोखतात.