JOIN US
मराठी बातम्या / Viral / नशीब नव्हे ही गणिताची कमाल! पठ्ठ्याने तब्बल 14 वेळा जिंकला जॅकपॉट; वापरला जबरदस्त फॉर्म्युला

नशीब नव्हे ही गणिताची कमाल! पठ्ठ्याने तब्बल 14 वेळा जिंकला जॅकपॉट; वापरला जबरदस्त फॉर्म्युला

लॉटरी खरेदी करणारी ही व्यक्ती नशीबावर अवलंबून राहिली नाही तर तिने एक गणिती सूत्र वापरलं आणि प्रत्येकवेळी ती जिंकली.

जाहिरात

गणिताच्या जोरावर जिंकले 14 जॅकपॉट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कॅनबेरा, 07 जून : आपण श्रीमंत व्हावं, आपल्याकडे पैसाच पैसा असावा असं कुणाला वाटत नाही. लखपती किंवा करोडपती बनण्याचं स्वप्नं प्रत्येकाचं असतं. श्रीमंतीचा झटपट मार्ग म्हणजे लॉटरी . पण ही लॉटरी लागण्यासाठीही नशीब लागतं. कित्येक लोक लॉटरीची इतकी तिकीटं घेतात पण तरी त्यांना लॉटरी लागत नाही. त्यामुळे ते नशीबाला दोष देतात. पण तुम्हाला वाचून धक्का बसले एका व्यक्तीने एक-दोन नव्हे तर तब्बल 14 वेळा जॅकपॉट जिंकला आहे. तेसुद्धा नशीबाच्या जोरावर नव्हे तर एका साध्यासोप्या गणिताने. एका अहवालानुसार 1.4 कोटी लोकांपैकी फक्त एकच मोठी लॉटरी जिंकतो. तेही त्याच्या आयुष्यात फक्त एकदाच. पण स्टीफन मँडल नावाच्या व्यक्तीने 14 जॅकपॉट जिंकले आहेत. त्याने इतका पैसा जिंकला की फक्त घर नव्हे तर संपूर्ण परिसरच तो विकत घेऊ शकतो.

स्टीफन मँडल हा रोमानियन वंशाचे ऑस्ट्रेलियन नागरिक आणि गणितज्ज्ञ. स्टीफन नोकरीच्या काळात अधिक पैसे कमवण्यासाठी 1960 मध्ये लॉटरी क्षेत्रात प्रवेश केला. त्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर गणितं लढवून लॉटरी जिंकली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्याने जिंकलेली पहिलीच लॉटरी इतकी मोठी होती की तो रोमानिया सोडून आपल्या कुटुंबासह ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला. ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर त्याने रोमानिया, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत लॉटरी खरेदी केली आणि प्रत्येक वेळी जिंकू लागला. काय सांगता! काहीच न करता प्रत्येक महिना मिळणार 10 लाख; पण कसे ते पाहा परिस्थिती अशी आली की लॉटरी अधिकारी अस्वस्थ झाले. मंडेलला रोखण्यासाठी त्यांनी कडक नियम केले. एका व्यक्तीकडून सर्व तिकिटे खरेदी करण्यास बंदी घातली. नियम कडक झाल्यावर मंडेलने लॉटरी फर्म स्थापन केली. तेव्हाच त्याला कळलं की अमेरिकेत असे कडक नियम नाहीत. त्याने अमेरिकेत जाऊन लॉटरी खरेदी करायला सुरुवात केली. सर्व लोकांना सोबत घेऊन तिकीट खरेदी सुरू केली. जे आकडे सांगत असत, त्यापैकी एक ना एक नंबर असायचाच. अशा रितीने प्रत्येक मोठी लॉटरी त्याच्या नावे व्हायची. अमेरिकेत लॉटरीतून त्याने 3 कोटी कमावले. सर्वात मोठा जॅकपॉट व्हर्जिनियामध्ये जिंकला. मात्र या काळात त्याच्यावर फसवणुकीचा आरोप झाला आणि त्याला 20 महिने तुरुंगवास भोगावा लागला, पण तो कधीच थांबला नाही. भांडणामुळे फळफळलं नवरा-बायकोचं नशीब; पत्नीशी भांडला आणि पती झाला करोडपती स्टिफन जेव्हा कधी  लॉटरी खरेदी करायचा, तेव्हा तो जो अंदाज लावायचा तो बरोबर निघायचा. विशेष गणिती सूत्र वापरून तो 5 आकडे काढायचा आणि सहावा आकडा अंदाजे सांगायचा, जो बरोबर असायचा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या