मुंबई लोकल ट्रेनमध्ये हेल्मेट घालून प्रवास करणारा प्रवासी
मुंबई, 09 मार्च : हेल्मेट सामान्यपणे बाईक प्रवासात वापरलं जातं. बाईकवरून अपघात झाल्यास सुरक्षेसाठी म्हणून हेल्मेट असतं. बाईक चालवताना डोक्यावर हेल्मेट असेल आणि अपघात झाला तर डोक्याला गंभीर दुखापत होत नाही आणि जीव बचावतो. असं असलं तरी कित्येक बाईकस्वार ड्रायव्हिंग करताना हेल्मेट घालत नाही. पण एक तरुण सध्या चक्क मुंबई लोकल ट्रेन मध्ये हेल्मेट घालून फिरताना दिसतो आहे. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हेल्मेट घालून मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या या प्रवाशाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोकल ट्रेनमध्ये हा तरुण हेल्मेट घालून का फिरत आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याच व्हिडीओत या तरुणानं या प्रश्नाचं उत्तरही दिलं आहे. हेल्मेट घालून लोकल प्रवास का करत आहे, याचं कारण त्याने दिलं आहे. ट्रेन चालकाला रात्रीच्या वेळी असं दिसतं समोरचं दृश्य; VIDEO पाहून उडेल थरकाप, Elon Musk यांनीही केली कमेंट व्हिडीओत तुम्ही पाहू शकता लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या या तरुणाच्या डोक्यावर हेल्मेट आहे. ट्रेनमधील सर्व प्रवाशांचं लक्ष त्याच्याकडेच आहे. काही लोक त्याला याबाबत कारण विचारतात. तेव्हा तो या व्हिडीओत सांगत, सर्वात आधी आपल्याला आपल्या सुरक्षेचा विचार करायला हवा. बाईक असो वा ट्रेन प्रत्येक वेळी आपल्या सुरक्षेकडे लक्ष द्यायला हवं.
या तरुणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. कुणी या व्यक्तीचं समर्थन केलं आहे तर कणी लोकल ट्रेनही सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्यात आहेत.
तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.