हेडलाईटल वापरून बनवला स्वस्तात मस्त TV
नवी दिल्ली 22 जून : भारतात जुगाड करणाऱ्या लोकांची कमतरता नाही. इथे एकापेक्षा एक असे लोक आहेत जे आपल्या डोक्याचा अतिवापर करतात आणि अशा गोष्टी तयार करतात की जग फक्त बघत राहातं. इथे असे लोक आहेत, जे कधी कारचं हेलिकॉप्टरमध्ये आणि कधी बाईकचं कारमध्ये रूपांतर करतात. सोशल मीडियावरही अनेकदा देसी जुगाड वापरून बनवलेल्या विविध गोष्टी व्हायरल होतात, ज्यांना पाहून सगळेच थक्क होतात. Viral Video: हे काय! आधी ग्लासातून स्वतःच दारू प्यायली; मग नशेत माकडाने काय केलं पाहा सध्या अशाच एका जुगाडचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही विचारात पडाल. यात एका व्यक्तीने असा जुगाड केला की बाईकच्या हेडलाईटचं रुपांतर टीव्ही स्क्रीनमध्ये झालं. बाईकच्या हेडलाईटचं काम प्रकाश देणं हे आहे, हे तुम्हाला माहीत असेलच. रात्रीच्या वेळी ही एक अतिशय उपयुक्त गोष्ट आहे, परंतु जर कोणी त्या हेडलाइटला टीव्ही स्क्रीन बनवलं तर? व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती बाईकच्या वर बसला आहे, तर त्याच्याभोवती दोन-तीन मुलं उभी आहेत आणि एक व्यक्ती व्हिडिओ बनवत आहे.
तो दाखवतो की बाईकच्या हेडलाईटमध्ये टीव्हीसारखं गाणं सुरू आहे आणि बाईकच्या वर एक छोटासा लाऊडस्पीकर देखील आहे, ज्याचा आवाज दूरवर ऐकू येत आहे. असा देसी जुगाड तुम्ही क्वचितच पाहिला असेल. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर prince_arts___ नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 23 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 1 दशलक्षाहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. नेटकरी यावर विविध मजेदार प्रतिक्रियादेखील देत आहेत. कोणी म्हणत आहे, ‘छंद ही मोठी गोष्ट आहे’. तर कोणी ‘भारतात टॅलेंटची कमतरता नाही’ असं म्हणत आहे. त्याचप्रमाणे एका यूजरने ‘आता रात्री लाईट कशी लावणार भाऊ’ असा सवाल केला आहे, तर एकाने ‘जग खूप दूर गेलं आहे, आम्ही मागे राहिलो’ असं लिहिलंआहे. .