झोपेतच बंदूक उचलून गोळी झाडली (प्रतिकात्मक फोटो)
नवी दिल्ली 16 जून : आपण सर्वजण स्वप्नं पाहतो. कधीकधी ते सत्याच्या खूप जवळ असतात आणि आपल्याला अशा जगात घेऊन जातात जे प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. पण काही लोक यात विचित्र गोष्टीही करतात. अशाच एका व्यक्तीची कहाणी समोर आली आहे. ज्याला रात्री झोपेत असताना स्वप्न पडलं की काही चोरटे त्याला लुटत आहेत. तो इतका घाबरला, की त्याने शेजारी ठेवलेली बंदूक उचलली आणि गोळीबार केला. त्याला वाटलेृं की आपण दरोडेखोरावर गोळी झाडतोय, पण गोळी थेट त्याच्या पायाला लागली आणि सगळीकडे रक्तच दिसू लागलं. हे प्रकरण अमेरिकेतील इलिनॉइचं आहे. 62 वर्षीय मार्क डिकारा रात्री आपल्या घरात झोपला होता. मग त्याला स्वप्न पडू लागली. काही दरोडेखोर त्याच्या घरात घुसल्याचं त्यांनी स्वप्नात पाहिलं. चोर त्यांचं सगळं सामान घेऊन जात असल्याचं त्यांना दिसलं. मग नंतर स्वप्नात चोर आपल्याला मारहाण करत असल्याचं त्यांनी पाहिलं. हे पाहून डिकाराने शेजारी ठेवलेलं 357 मॅग्नम रिव्हॉल्व्हर घेत अंधारात गोळी झाडली. त्याने दरोडेखोराला मारलं असं त्याला वाटलं, पण ही गोळी त्याच्या पायाला लागली. फिरत्या पंख्यात अडकलेला विषारी साप खाली बसलेल्या व्यक्तीच्या अंगावर पडला अन्…थरकाप उडवणारा VIDEO तो आक्रोश करत जागा झाला तेव्हा त्याला कळलं की आजूबाजूला फक्त रक्तच आहे. तो स्वतः रक्ताने माखलेला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं. सुदैवाने गोळी त्याच्या पायाला लागल्याने त्याचे प्राण वाचले. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता घरात कोणीही शिरले नसल्याचं समोर आलं. डिकाराला स्वप्नात असं वाटलं होतं, असं कळालं. सुदैवाने त्याने इतर कोणावर गोळी झाडली नाही. त्याचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला असून त्याच्यावर गंभीर आरोपांनुसार खटला सुरू आहे. बेभान गोळीबार करणे, लोकांचा जीव धोक्यात घालणे, अंदाधुंद गोळीबार करणे अशा आरोपांमध्ये त्याच्याविरोधात खटला सुरू आहे