JOIN US
मराठी बातम्या / Viral / आलिशान हॉटेलमध्ये घेतली रूम; अचानक येऊ लागली दुर्गंधी, बेडखाली डोकावताच सरकली पायाखालची जमीन

आलिशान हॉटेलमध्ये घेतली रूम; अचानक येऊ लागली दुर्गंधी, बेडखाली डोकावताच सरकली पायाखालची जमीन

झांग थकला होता, म्हणून तो खोलीत 3 तास झोपला. तो थोडा वेळ बाहेर गेला. जेवल्यानंतर तो परत आला तेव्हा त्याला तीव्र दुर्गंधी जाणवली.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 04 मे : अनेक वेळा पर्यटकांसोबत अशा घटना घडतात, ज्यामुळे ते हादरतात. काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती की, पर्यटक त्याच्या खोलीत झोपला होता तेव्हा एक साप त्याच्या जवळ येऊन बसला. डोळे उघडल्यावर त्याची अवस्थाच बिकट झाली. अशीच काहीशी बातमी तिबेटमधून समोर आली आहे. यात आलिशान हॉटेलमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला त्या खोलीचं वास्तव समजल्यावर तो हादरला. भाडेकरुच्या पत्नीशी घरमालकाचे अवैध संबंध, पतीसह मेव्हण्याने दिली भयानक शिक्षा मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनचे रहिवासी श्री झांग याला प्रवासाची खूप आवड होती. तो अनेकदा त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असे. एके दिवशी तो तिबेटमधील ल्हासाला भेट देण्यासाठी आला. एका आलिशान हॉटेलमध्ये रूम बुक केली. खोलीत गेल्यावर त्याला उग्र वास येत होता. पण पायाला दुर्गंधी येत असावी, असं त्याला वाटलं. झांग थकला होता, म्हणून तो खोलीत 3 तास झोपला. तो थोडा वेळ बाहेर गेला. जेवल्यानंतर तो परत आला तेव्हा त्याला तीव्र दुर्गंधी जाणवली. त्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना दुसरी खोली देण्यास सांगितलं. त्याला दुसरी रूम मिळाली पण काही वेळाने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी रूम साफ केल्याचं सांगितलं. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आधीच्या रूममध्ये जाऊ शकता, असं त्यांनी सांगितलं. तो रूममध्ये परत गेला पण पायाला ठेच लागताच ओरडला. त्याच्या पलंगाखाली एक मृतदेह होता.

त्याने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलीस पोहोचले आणि डीएनए नमुना गोळा केला. नंतर कळालं, की पोलिसांनी मारेकऱ्याला आधीच अटक केली होती. कारण त्याची माहिती आधीच मिळाली होती. या व्यक्तीने संपूर्ण घटना सोशल मीडियावर पोस्ट केली जी काही वेळातच व्हायरल झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या