कोल्हापुरात मृत्यूचं तांडव, क्षणात कुटुंब संपवलं 

कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने आपल्या दोन मुलांसह पत्नीला कालव्यात ढकलले.

या घटनेत पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला आहे, तर मुलीला वाचवण्यात यश आलं आहे. 

 पत्नी आणि मुलांना पाण्यात ढकलल्यानंतर पतीनेही गळफास लावून आत्महत्या केली

संदीप पाटील, पत्नी राजश्री संदीप पाटील, मुलगा समित अशी मृतांची नाव आहेत

 तर 14 वर्षांची मुलगी  श्रेया पाटीला वाचवण्यात यश आलं आहे

कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत असलेल्या डाव्या कालव्यामध्ये ही घटना घडली

 मुलगी श्रेयाच्या सांगण्यावरून ग्रामस्थांनी शोध घेतला असता दोन मृतदेह कालव्यात आढळून आले आहेत

संदीप पाटील यांचा साऊंड सिस्टीमचा व्यवसाय आहे, मात्र त्यांनी टोकाचं पाऊल का उचलल? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही

 या घटनेनं कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.