सिंहिणीचा गाईवर हल्ला
नवी दिल्ली 04 जुलै : सिंह किंवा सिंहिणीने एखाद्या प्राण्यावर हल्ला केला, तर त्यांच्या तावडीतून वाचण जवळपास अशक्य होऊन जातं. अशात सिंहीणीच्या तोंडातून भक्ष्य सोडवणं हे मोठं धाडसाचं काम आहे. अनेकदा असे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्यात सिंहीण डोळ्याच्या पापण्या मिटण्याच्या आत शिकार करताना दिसते. मात्र, आता जो व्हिडिओ समोर आला आहे, तो अतिशय वेगळा आहे. ज्यामध्ये एक सिंहीण रस्त्याच्या कडेला असलेल्या गायीवर हल्ला करताना दिसत आहे. मात्र यानंतर पुढे जे काही घडलं, ते पाहून तुम्ही थक्क व्हाल. या व्हिडिओमध्ये एक शेतकरी स्वतःचा जीव धोक्यात घालून गायीचा जीव वाचवताना दिसतो. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक सिंहीण गायीवर हल्ला करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की, सिंहीण आपल्या पंजाने गायीला खाली पाडण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी तिने गाईची मान आपल्या जबड्यात पकडली आहे. खूप प्रयत्न करूनही गायीला त्या सिंहिणीच्या तावडीतून सुटता येत नाही. तेवढ्यात एक शेतकरी तिथे येतो आणि गाईला सिंहिणीच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करू लागतो.
सुरुवातीला हा शेतकरी ओरडून सिंहिणीला तिथून पळवून लावण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा सिंहीण गायीला सोडत नाही, तेव्हा शेतकरी आजूबाजूला काहीतरी शोधू लागतो. शेतकरी हातात दगड घेऊन सिंहीणीच्या दिशेने जातो आणि दगड त्या दिशेने फेकतो. यानंतर घाबरून सिंहीण गायीला सोडून तिथून पळताना दिसते. भयानक! उंटाने घेतला मालकिणीचा जीव, आधी हात चावला मग जबड्या अडकवलं तिचं डोकं हा व्हिडिओ गुजरातमधील जुनागडचे नगरसेवक विवेक कोटाडिया यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. ही घटना गुजरातच्या गीर सोमनाथची आहे. ही संपूर्ण घटना रस्त्याच्या मधोमध घडली. काही अंतरावर कारमध्ये बसलेले लोक या घटनेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका यूजरने ‘क्या शेर बनेगा रे तू’ असं लिहिलं आहे.