JOIN US
मराठी बातम्या / Viral / भुकंपाच्या वेळी स्वतःला वाचवायचं सोडून दारुच्या बाटल्या वाचवत बसला, व्यक्तीसोबत काय झालं पाहा..VIDEO

भुकंपाच्या वेळी स्वतःला वाचवायचं सोडून दारुच्या बाटल्या वाचवत बसला, व्यक्तीसोबत काय झालं पाहा..VIDEO

व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती दारूच्या बाटल्या भूकंपाच्या धक्क्याने खाली पडू नयेत म्हणून त्या पकडून बसलेला दिसत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 27 मार्च : तुर्कस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या भीषण भूकंपानंतर काही दिवसांपूर्वी देशातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. तुर्कस्तानमधील भूकंपाने धोकादायक विध्वंस घडवून आणला आणि हजारो लोकांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर भारताची राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र सुदैवाने मोठी हानी झालेली नाही. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये लोक खबरदारीचा उपाय म्हणून भूकंप आल्यावर घराबाहेर पडताना दिसत आहेत. लपून तिसरं लग्न करत होता व्यक्ती; इतक्यात पहिल्या पत्नीची मंडपात एन्ट्री अन् हाय व्होलटेज ड्रामा..VIDEO दरम्यान, लोकांनी भूकंपाशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये लाइट बल्ब आणि पंखे घरांमध्ये हालताना दिसतात. मात्र याच दरम्यान आता एक विचित्र व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती भूकंप आल्यावर घराबाहेर पडण्याऐवजी दारूच्या बाटल्या धरून बसलेला दिसत आहे, जेणेकरून या बाटल्या पडू नये. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क झाले.ॉ

संबंधित बातम्या

सहसा भूकंप झाल्यास जीव वाचवण्यासाठी कोणतीही व्यक्ती घरातील कोणतीही मौल्यवान वस्तू सोडून आधी बाहेर पळते. मात्र व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती दारूच्या बाटल्या भूकंपाच्या धक्क्याने खाली पडू नयेत म्हणून त्या पकडून बसलेला दिसत आहे. हे पाहिल्यानंतर यूजर्सना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

वृत्त लिहिपर्यंत या व्हिडिओला सोशल मीडियावर 2 लाख 26 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. @ajaychauhan41 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाच्या धक्क्यांपासून एक व्यक्ती आपल्या मौल्यवान वस्तूंचे संरक्षण करताना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओ पाहून युजर्स यावर आपल्या मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या