JOIN US
मराठी बातम्या / Viral / व्यक्तीची हिंमत पाहूनच घाम फुटेल, चक्क सिंहांसोबत खेळायला गेला अन् पुढे दिसलं चकित करणारं दृश्य

व्यक्तीची हिंमत पाहूनच घाम फुटेल, चक्क सिंहांसोबत खेळायला गेला अन् पुढे दिसलं चकित करणारं दृश्य

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एक-दोन नव्हे तर तीन सिंहांसोबत अगदी आरामात वेळ घालवताना दिसत आहे, जणू ते त्याची पाळीव मांजर किंवा श्वान आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 08 मे : भरत राजा लहानपणी सिंहांशी खेळत असल्याच्या आणि त्यांच्या तोंडातील दातही मोजत असल्याचं तुम्ही पौराणिक कथांमध्ये ऐकलं असेल. पण आजच्या युगात कोणी असं करू शकेल का? हिंस्त्र आणि भयंकर सिंहांचं नाव ऐकताच मृत्यू डोक्यावर घिरट्या घालताना दिसतो. परंतु आता एका व्यक्तीचा असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. सिंह आणि सिहिणींसोबत सामना होण्याची कल्पनाही सामान्य माणसासाठी घाम फोडणारी आहे. पण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एक-दोन नव्हे तर तीन सिंहांसोबत अगदी आरामात वेळ घालवताना दिसत आहे, जणू ते त्याची पाळीव मांजर किंवा श्वान आहेत. सिंहाशी मैत्री करणारा हा माणूस किती शूर असेल याची कल्पना करा.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा माणूस पहिल्यांदा तीन लहान सिंह आणि एका सिंहिणीसोबत खेळताना दिसत आहे. यापैकी एक सिंह त्याला मिठी मारण्याच्या आणि प्रेम करण्याच्या प्रयत्नात त्याचा शर्ट फाडतो, परंतु तरीही ती व्यक्ती त्याला घाबरत नाही. इतक्यात तिथे जंगलाच्या राजाची एन्ट्री होते. हा सिंह प्रचंड मोठा दिसतो. मात्र तोदेखील या व्यक्तीजवळ येऊन अतिशय शांत बसतो. जणू तो आपल्या प्रिय मित्रासोबत बसून चिल करत आहे.

संबंधित बातम्या

या व्हिडिओमध्ये दिसणार्‍या व्यक्तीचं नाव डीन श्नाइडर आहे. तो स्वित्झर्लंडचा 28 वर्षांचा मुलगा आहे, त्याला प्राणी खूप आवडतात. त्याचं स्वतःचं फाउंडेशन आहे, ज्याद्वारे तो प्राण्यांना मदत करतो. त्याच्या बायोमध्ये त्याने स्वतः सांगितलं आहे, की तो आफ्रिकेत राहतो आणि प्राण्यांना त्याचं कुटुंब मानतो. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या