विमानात धक्कादायक घटना
नवी दिल्ली 23 जून : फ्लाइटमध्ये सतत काही ना काही विचित्र घडल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून समोर येत आहेत. यात विमानातच प्रवाशांची कधी मारामारी, कधी हाणामारी, कधी दुसऱ्या प्रवाशावर लघवी करणं, तर कधी प्रवाशी किंवा फ्लाइट अटेंडंटसोबत विनयभंग अशा घटनाही घडत आहेत. विमानातील एअरहोस्टेसच्या मजबुरीचा गैरफायदा घेऊन प्रवासी अनेकदा त्यांच्याशी गैरवर्तन करतात आणि मर्यादा ओलांडतात, असंही अनेकदा पाहायला मिळतं. टेक्सासचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात फ्लाईटमध्ये एवढा वाद झाला की प्रवासी फ्लाइटमधून उडी मारण्याचा प्रयत्न करताना दिसला. हे प्रकरण टेक्सासमधील युनायटेड एअरलाइन्सच्या विमानातील आहे. यातील भांडणाचे फोटो व्हायरल होत आहेत. या घटनेचा व्हिडिओ थक्क करणारा आहे. कारण मारामारी आणि भांडणं तरी सामान्य आहेत, मात्र यात एका सुशिक्षित प्रवाशाने चक्क फ्लाइटमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला. हे फक्त त्याच्यासाठीच नाही तर बाकीच्या प्रवाशांसाठीही जीवघेणं ठरू शकत होतं. खरं तर, पत्नीच्या सीटवरून झालेल्या गोंधळानंतर एका प्रवाशाने फ्लाइट अटेंडंटला धक्काबुक्की केली. यानंतर घबराटीचं वातावरण निर्माण झालं. लोकांनी या प्रवाशाला समजावण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत त्याने आपत्कालीन गेट उघडलं आणि फ्लाइटमधून उडी मारण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ यूट्यूबवर शेअर केला गेला आहे. विमानात चुकूनही बुक करू नका ही सीट; खुद्द पायलटनेच दिला सल्ला, कारणही सांगितलं न्यूयॉर्क पोस्टवर शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, कोडी बेंजामिन लोविन्स नावाच्या प्रवाशाने फ्लाइट अटेंडंटवर हल्ला केला इतकंच नाही तर तिला जोरदार धक्काबुक्की केली. जेव्हा लोकांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो वेगात धावत इमर्जन्सी एक्झिट गेटच्या दिशेने गेला आणि मग दरवाजा उघडून उडी मारण्याचा प्रयत्न करू लागला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवाशाच्या पत्नीला तिच्या सीटवरून दुसऱ्या सीटवर जाण्यास सांगितलं होतं. त्यामुळे हा सगळा प्रकार घडला. यावरून पती इतका संतापला की, प्रकरण टोकाला पोहोचलं. फ्लाइटमध्ये हा सगळा गोंधळ सुरू असताना तिथे उपस्थित असलेल्या अन्य एका प्रवाशाने ही घटना कॅमेऱ्यात कैद केली. सीट बदलण्याच्या मुद्द्यावरून लोविन्स भडकले, तेव्हा फ्लाइट अटेंडंटने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशाने अटेंडंटलाच धक्काबुक्की केली. यानंतर पळत जात एक्झिट गेट उघडलं. मात्र, मोठ्या प्रयत्नानंतर या प्रवाशाला एक्झिट गेटजवळून सुखरूप दूर करण्यात आलं. अन्यथा मोठी घटना घडली असती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर युनायटेड एअरलाइन्सनेही आपली भूमिका मांडली आहे. त्यांना या प्रवाशाला आपल्या एअरलाइन्सवर आजीवन बंदी घातली आहे.