दगडांपासून बनवली मांजरीची अप्रतिम कलाकृती
नवी दिल्ली 28 जून : सोशल मीडियावर सँड आर्टिस्टच्या कलाकारीचे व्हायरल झालेले व्हिडिओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील. असे कलाकार अनेकदा समुद्रकिनाऱ्यावरील वाळूने विविध प्रकारची चित्रे काढतात. ओडिसाचे प्रसिद्ध सँड आर्टिस्ट सुदर्शन पटनायक यांनी काढलेलं वाळूचं चित्र चांगलेच व्हायरल होत असतं. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं बघायला मिळत आहे. ज्यामध्ये खडे आणि दगडांनी एक कलाकृती बनवली आहे, जी लोकांना खूप आवडत आहे. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हीही याचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. हे माकड आहे की माणूस? VIDEO पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का, यात असं काय? इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, ही कलाकृती ब्रिटिश कलाकार जस्टिन बॅटमॅनने केली आहे. त्याने खडे आणि दगडांच्या साहाय्याने मांजरीचं चित्र बनवलं आहे. त्याने खडे आणि दगड ठेवून मांजरीचं अप्रतिम चित्र काढल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 10 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. ब्रिटीश कलाकार जस्टिन बॅटमॅन जगभरातील समुद्रकिनाऱ्यांवर खड्यांपासून आकर्षक चित्रे तयार करण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, की चियांग माईमध्ये संपूर्ण शहरात मांजरींची पूजा केली जाते. तिथे लोक मांजरींना स्थानिक तलावावर फिरायला घेऊन जातात.
सोशल मीडियावर यूजर्स या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं, अविश्वसनीय. भारतातही वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी पुरी बीचवर सर्वात उंच वाळूचा महल बनवला होता, ज्याची उंची समुद्रकिनाऱ्यापासून 14.84 मीटर होती. समुद्रकिनाऱ्यावरील अशा प्रकारच्या कलाकृती लोकांना खूप आवडतात. ओडिसाच्या समुद्रकिनाऱ्यावरील वाळूपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक बड्या नेत्यांची छायाचित्रे तयार करण्यात आलेली आहेत.