ऑफिसमध्ये सोडला साप
हैदराबाद 27 जुलै : सरकारी अधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळे सर्वसामान्य जनता किती त्रस्त आहे, हे कोणापासूनच लपून राहिलेलं नाही. त्यांची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली तरी परिस्थिती जैसे थेच राहाते. अधिकार्यांच्या या वृत्तीने सामान्य माणूस किती मेटाकुटीस येतो, याचं ताजं उदाहरण तेलंगणातील हैदराबादमध्ये पाहायला मिळालं. ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे संतप्त झालेल्या एका व्यक्तीने चक्क साप घेऊन कार्यालयात सोडला. तेलंगणामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे हैदराबाद शहरातील अनेक भागात पूरसदृश स्थिती आहे. लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे. दरम्यान, अलवाल येथे एका व्यक्तीच्या घरात साप घुसला. या संदर्भात त्याने जीएचएमसीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र सहा तास उलटूनही कारवाई झाली नाही. यामुळे संतापलेल्या व्यक्तीने साप स्वतःहून पकडून वॉर्ड ऑफिसमध्ये नेला आणि अधिकाऱ्यांच्या टेबलावर सोडला.
हैदराबादचे भाजप नेते विक्रम गौर यांनी हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं की, कल्पना करा की ती व्यक्ती किती असहाय्य झाली असेल. ज्याने हे पाऊल उचललं. त्यांनी सांगितलं की, हैदराबादच्या अलवाल येथील जीएचएमसी वॉर्ड ऑफिसमध्ये जेव्हा त्या व्यक्तीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले तेव्हा तो कार्यालयात साप सोडण्यास भाग पडला. भारतीय रेल्वेची एक चूक अन्.., शताब्दी एक्सप्रेसचा मालक बनला शेतकरी, अख्खी ट्रेनच झाली मालकीची संपत नावाच्या या व्यक्तीचा आरोप आहे की, घरात साप पाहिल्यानंतर त्याने जीएचएमसीच्या अधिकाऱ्यांना अनेकदा फोन केला. मात्र तास उलटून गेल्यानंतरही अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तो संतप्त झाला. यानंतर निषेध व्यक्त करण्यासाठी त्यानी सापाला थेट कार्यालयात सोडलं. हे पाहून अधिकारी घाबरले आणि तिथून पळू लागले.