चॉकलेट चोरल्याने 18 महिने तुरुंगवास
नवी दिल्ली 27 जुलै : गोड पदार्थांबद्दल बोलायचं झालं तर, लहान मुलं असोत किंवा प्रौढ, सर्वांनाच चॉकलेट्स खायला आवडतात. गोड असल्यामुळे लोकं ती कमी खातात, पण लहान मुलांना जेवढी चॉकलेट्स मिळतात, तेवढी कमीच वाटतात. अनेक वेळा घरचे रागावले तरी ते गुपचूप चॉकलेट बाहेर काढून खातात. मात्र, जर कोणी मोठ्या वयातील व्यक्तीने चॉकलेट चोरले तर त्याला काय शिक्षा होईल? तुम्हालाही वाटलं असेल की हा काय प्रकार आहे. कोणी मोठी व्यक्ती चॉकलेट का चोरेल आणि चोरी केली तरी त्याच्यावर काय गुन्हा दाखल होणार आहे. मात्र अशी अजब घटना घडली आहे, जी जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. एका व्यक्तीने चॉकलेटही चोरलं आणि त्याला आता 18 महिने म्हणजे दीड वर्ष तुरुंगात राहण्याची शिक्षा झाली आहे. आता तुम्हालाही संपूर्ण प्रकरणाबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असेल. कावळ्यावर जडला गुंडाचा जीव! प्रेमात असं काय काय केलं की वाचूनच अजब वाटेल ही घटना ब्रिटनमधील आहे, ज्यात जॉबी पूल नावाच्या 32 वर्षीय व्यक्तीने एकूण 2 लाख चॉकलेट एग्स चोरले. कॅडबरी क्रीम एग्जच्या या एकूण साठ्याचं बाजारमूल्य 40 हजार यूएस डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 32 लाख 79 हजार रुपये आहे. ही घटना 11 फेब्रुवारी रोजी सॅटफोर्ड पार्कमध्ये घडली. ब्रिटनमध्ये इस्टरच्या वेळी चॉकलेट एग्स मोठ्या प्रमाणात विकली जातात. त्यामुळे या चोरालाही अधिकाऱ्यांनी इस्टर बनी असे नाव दिले आहे. या प्रकरणाची सुनावणी श्रुबरी क्राउन कोर्टात झाली, जिथे चोराला दीड वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. कोर्टातील सुनावणीनुसार चोरट्याने क्रीम एग्जचा संपूर्ण ट्रॅक्टर चोरून नेला होता. चोराला अटक केल्यानंतर पोलिसांनी ट्विटरवर असंही लिहिलं की त्यांनी ख्रिसमसच्या वेळी 2 लाख इस्टर अंडी वाचवली. चॉकलेट एग्जची विक्री केवळ युनायटेड किंगडममध्ये इस्टरच्या वेळी 220 दशलक्षपर्यंत पोहोचते, त्यामुळे त्यावेळी झालेल्या चोरीमुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले होते.