पाळीव मगरीचा व्हिडिओ (प्रतिकात्मक फोटो)
नवी दिल्ली 23 जुलै : मगरीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यात मगर कधी मोठमोठ्या प्राण्यांची शिकार करताना दिसते तर कधी पाण्यात आराम करत असल्याचं दिसतं. पण अनेकवेळा असं दृश्य समोर येतं जे पाहून लोक हैराण होतात. अलीकडेच असा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये पाळीव मगरी आणि एका व्यक्तीची मस्ती पाहायला मिळते. पण या व्हिडिओमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट समोर आला आहे. कारण जेव्हा हा व्हिडिओ सुरू होतो तेव्हा लोकांना वाटलं होतं की मगर या व्यक्तीवर हल्ला करेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ बराच जुना आहे आणि तो फ्लोरिडाचा असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र तो नेमका कुठला आहे, याची पुष्टी झालेली नाही. हा व्हिडिओ नुकताच कोणीतरी शेअर केला आणि तो पुन्हा व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक व्यक्ती नदीच्या मध्यभागी बोट घेऊन फिरत आहे आणि त्याच्या हातात खाण्यासाठी काहीतरी घेतलेलं दिसत आहे.
व्हिडिओ पाहून असं वाटतं, जणू ती मगर त्या व्यक्तीलाच शोधत इथे आली आहे. थोड्याच वेळात ही मगर पाण्याखालून त्या बोटीजवळ पोहोचली, तेव्हा हे दृश्य पाहून लोकांना वाटलं की ती या व्यक्तीवर हल्ला करेल, पण झालं उलट. मगरीने व्यक्तीला धक्का मारला पण हा धक्का तिने व्यक्तीच्या हातातील अन्न मागण्यासाठी मारला होता. त्या व्यक्तीला हानी पोहोचवण्यासाठी नव्हता. Viral Video: 3 वर्षांनी मालकाला भेटला श्वान; समोर येताच जे केलं ते पाहून व्हाल भावुक मगर समोर येताच त्या व्यक्तीने त्याच्या हातातील मांसाचा तुकडा मगरीच्या तोंडात टाकला. यानंतर त्याने मगरीच्या अंगावर हात फिरवण्यास सुरुवात केली. व्हिडिओ पाहून असं जाणवतं की ही पाळीव मगर आहे आणि ती तिच्या मालकासमोर उभी राहून खायला मागत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.