JOIN US
मराठी बातम्या / Viral / OMG! पक्ष्यासारखा उडू लागला तरुण पण झाला धक्कादायक शेवट; WATCH VIDEO

OMG! पक्ष्यासारखा उडू लागला तरुण पण झाला धक्कादायक शेवट; WATCH VIDEO

पक्ष्यासारख्या उडणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

जाहिरात

तरुणाचा पक्ष्यासारखा उडण्याचा प्रयत्न

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 मे : पक्ष्यासारखं आकाशात स्वच्छंद उडावं असं कुणाला वाटणार नाही. तुम्हीही कधी ना कधी पक्ष्याच्या पंखासारखे आपले दोन्ही हात वर करून उडण्याचा प्रयत्न केला असेल. एका उंचीवरून का नाही अशा पद्धतीने तुम्ही उडत उडी मारली असेल. असाच पक्ष्यासारखा उडण्याचा प्रयत्न करणारा एक तरुण. जो पक्ष्यासारखा उडू लागला पण शेवट मात्र धक्कादायक झाला. पक्ष्यासारख्या उडणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. हा तरुण घराच्या छतावर गेला. त्याने आपले दोन्ही हात पक्ष्याच्या पंख्यासारखे पसरवले. पंखासारखे ते हलवत तो एका छतावरून दुसऱ्या छतावर उडू लागला. पण शेवटी त्याच्यासोबत धक्कादायक घडलं. रिकाम्या खुर्चीवर अचानक तरुणी कशी येते? जादूगाराची ती मॅजिक ट्रिक आली समोर, पाहा VIDEO व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका घराच्या छतावर हा तरुण आहे. तिथं इतर घरं आहे. एका घराच्या छतावरून तो दुसऱ्या घराच्या आणि नंतर तिसऱ्या घराच्या छतावर जातो. त्यानंतर घराजवळील एका छोट्या भिंतीवर तो उडी मारायला जातो. पण त्याच क्षणी त्याचा पाय घसरतो आणि त्याचा तोल जातो. तो धाडकन खाली कोसळतो. ज्या पद्धतीने तो पडला आहे, त्यावरून त्याला नक्कीच गंभीर दुखापत झाली असावी. व्हिडीओच्या मागे ‘पंछी बनू उडती फिरून मस्त गगन में’ हे गाणं ऐकायला येतं. त्यामुळे हा व्हिडीओ मजेशीर वाटतो. पण तो तितकाच धक्कादायक आहे. शिकार खूप झाली आता सिंहाचा माणसांसोबत ‘टग ऑफ वॉर’; कोणी मारली बाजी पाहा थरारक VIDEO gilgities2.0 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंटही येत आहेत. एकाने तर परा उडून गेला अशी प्रतिक्रिया दिली आहे.

संबंधित बातम्या

तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला आणि तुम्ही असा उडण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी तुमच्यासोबत असं काही घडलं होतं का, आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या