तरुणीला प्रपोज करताना नदीत पडला
नवी दिल्ली 28 मे : इंटरनेट हे एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण वेगवेगळ्या गोष्टी पाहू शकतो, ऐकू शकतो आणि वाचू शकतो. मात्र इथे सगळ्यात जास्त पसंती मजेशीर व्हिडिओंना मिळते. लोक हे व्हिडिओ केवळ पाहातच नाहीत तर एकमेकांसोबत शेअरही करतात. असाच एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही खूप हसाल. शाब्बास रे पठ्ठ्या! मुलाला तुडवत गेली घोडी, पण बैलाने वाचवलं; पुण्यातील थरारक VIDEO आपल्या सर्वांना माहित आहे की कोणत्याही व्यक्तीवर प्रेम व्यक्त करणं हा जीवनातील सुंदर क्षणांपैकी एक आहे. यामुळेच लोक त्याला खास बनवण्यासाठी वेगवेगळी ठिकाणं निवडतात, जेणेकरून हा क्षण अशा प्रकारे घालवता येईल की तो कायमस्वरूपी लक्षात राहील. पण कधी कधी काही खास करायचं ठरवलं ती ऐनवेळी असं काहीतरी घडतं की सगळाच खेळ बनतो. केलेला प्लॅनही बिघडतो. सध्या एका व्यक्तीचा असाच व्हिडिओ समोर आला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती त्याच्या गर्लफ्रेंडला लग्नासाठी प्रपोज करणार असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. त्यावेळी तो पँटच्या खिशातून अंगठी काढतो. खिशातून अंगठी काढताच ती अंगठी खाली पाण्यात पडते. हे सर्व पाहून प्रेयसीही हैराण होते. अंगठी नदीत पडताच तरुण ती काढण्याचा प्रयत्न करतो मात्र या प्रयत्नात तो स्वतःही नदीत पडतो. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक त्याला प्रचंड पसंती देत आहेत. @cctvidiots नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ही बातमी लिहेपर्यंत 70 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून त्यावर आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिलं की, ‘हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर मला हसू आवरत नाहीये.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिलं, ‘आणखी बनवा स्पेशल…सगळा खेळ झाला ना.’