JOIN US
मराठी बातम्या / Viral / पत्नीसोबत घटस्फोट झाल्याने आनंद साजरा करायला बंजी जंपिंगसाठी गेला, तिथेच दोरी तुटली अन्...

पत्नीसोबत घटस्फोट झाल्याने आनंद साजरा करायला बंजी जंपिंगसाठी गेला, तिथेच दोरी तुटली अन्...

घटस्फोट साजरा करण्यासाठी तो ब्राझीलच्या ट्रीपवर गेला होता. राफेलने बंजी जंपिंग करण्याचा प्लॅन केला. पण पुढे काय घडणार आहे, याची त्याला कल्पना नव्हती

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 07 मे : बरेच लोक जेव्हा अॅडव्हेंचर करण्यासाठी जातात तेव्हा ते बंजी जंपिंगदेखील करतात. हा एक अद्भुत अनुभव आहे पण त्यासाठी खूप धैर्य लागतं. नुकतीच याच्याशी संबंधित अशी एक घटना समोर आली आहे, जी वाचूनच तुम्हाला धक्का बसेल. पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी एक व्यक्ती टूरवर गेला आणि बंजी जंपिंग होत असलेल्या ठिकाणी पोहोचला. बंजी जंपिंगसाठी झेपावताच त्याची दोरी तुटली. ही घटना पोर्तुगालमध्ये राहणाऱ्या राफेल या तरुणासोबत घडली आहे. या 22 वर्षीय तरुणाने नुकतंच काहीतरी वादामुळे पत्नीपासून घटस्फोट घेतला. हा घटस्फोट साजरा करण्यासाठी तो ब्राझीलच्या ट्रीपवर गेला होता. राफेलने बंजी जंपिंग करण्याचा प्लॅन केला. पण पुढे काय घडणार आहे, याची त्याला कल्पना नव्हती. राफेलने 70 फूट उंचीवरून उडी मारताच त्याची दोरी तुटली. हात बाहेर काढताच खांबाला धडकला, धावत्या ट्रेनमधून खाली पडला मुलगा, धडकी भरवणारा VIDEO यानंतर काही वेळातच तो खोल दरीत पडला. लोकांना वाटलं, की या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. परंतु काही तासांच्या अथक परिश्रमानंतर सुरक्षा आणि मदत कर्मचार्‍यांनी या व्यक्तीला खड्ड्यातून बाहेर काढलं. मात्र तोपर्यंत त्याच्या शरीराचे काही भाग तुटले होते. तो श्वास घेत होता, यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, तिथे उपचार सुरू करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर तरुणाने स्वतःहून सांगितलं, की ‘घटस्फोटानंतर मी आनंदी होतो. मला जीवनाचा प्रत्येक प्रकारे आनंद घ्यायचा होता.’ बंजी जंपिंग एक पर्यटन आणि मनोरंजन क्रियाकलाप आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला उंच ठिकाणाहून उडी मारण्याचा अनुभव दिला जातो. याl, व्यक्तीला लांब दोरीने किंवा बंजी कॉर्डला बांधले जाते आणि त्याला पूल, बुरुज, खडक किंवा हेलिकॉप्टर अशा उंच ठिकाणावरून उडी मारावी लागते. अशात अशावेळी अचानक दोरी तुटल्यास अनेकांचा जीवही जातो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या