नवी दिल्ली 07 मे : ट्रेनमध्ये प्रवास करत असताना तुम्हाला अनेकदा ट्रेनच्या दारात काही लोक उभे असलेले दिसले असतील. यापैकी काही लोक आश्चर्यकारक गोष्टी देखील करू लागतात, ज्या अनेकदा त्यांच्याच जीवावर बेततात. यात बहुतेक तरुण पिढीच असते, जी उत्साहात भान हरपते. आता व्हायरल होत असलेला हा व्हिडिओच घ्या, ज्यामध्ये चालत्या ट्रेनच्या दरवाज्यातून हात बाहेर काढताना एका तरुणाचा हात खांबाला आदळतो आणि त्याला हा अतिउत्साह चांगलाच महागात पडतो. हा VIDEO विचलित करू शकतो! रेल्वे ट्रॅकवर रिल बनवत होता तरुण, मागून वेगात ट्रेन आली अन्..भयानक दुर्घटना सोशल मीडियावर एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एक ट्रेन वेगाने धावत आहे आणि काही लोक ट्रेनच्या दारात उभे आहेत. इतक्यात त्यातील एकाला गंमत सुचते आणि खेळता खेळता तो हात बाहेर काढून जवळून जाणाऱ्या झाडांला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागतो. मात्र, झाडानंतर लगेचच एक खांब येतो, जो त्याच्या हाताला धडकतो आणि ही व्यक्ती ट्रेनच्या बाहेर पडते.
— 1000 WAYS TO DIE (@1000waystod1e) May 5, 2023
अपघाताचा हा व्हिडिओ ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या अन्य एका प्रवाशाने रेकॉर्ड केला आणि तो ऑनलाइन अपलोड केला. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ कधी आणि कुठे शूट करण्यात आला याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. व्हिडिओमध्ये अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीची प्रकृती कशी आहे, याबद्दलही माहिती मिळू शकलेली नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणीही थक्क होईल. रेल्वे अपघाताचा हा व्हिडिओ मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 8 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 23 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे.