नवी दिल्ली 30 एप्रिल: आजकाल सोशल मीडियावर अनेक नवनवे व्हिडिओ व्हायरल (Video Viral on Social Media) झाल्याचं पाहायला मिळतं. हे व्हिडिओ अनेकदा नेटकऱ्यांना खळखळून हसवतात. जे व्हिडिओ विनोदी आणि मनोरंजन करणारे असतात ते सोशल मीडियावर अपलोड होताच व्हायरल होतात. नेटकरी असे व्हिडिओ पाहून अनेकदा आपला मूडही ठीक करतात. नुकताच असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. अतिआत्मविश्वास नडला! विनाकारण सिंहासोबत लढायला गेलं हरणाचं पाडस; शेवटी काय घडलं बघा, VIDEO व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती व्यायाम करताना दिसत आहे. ज्याच्यासोबत अचानक एक घटना घडते. त्यानंतर आपला अपमान टाळण्यासाठी तो अगदी डोकं चालवून स्वतःला त्या परिस्थितीतून बाहेर काढतो. या व्यक्तीचा हा मजेशीर व्हि़डिओ (Funny Video Viral) पाहून कोणीही पोट धरून हसेल.
हा व्हायरल व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘सुरुवात कशीही असो, शेवट नेहमी स्टाईलमध्ये असावा. गुड मॉर्निंग’. ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पार्कमध्ये बांधलेल्या प्लॅटफॉर्मवर झोपून व्यायाम करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आपल्या जास्त वजनामुळे त्याचा तोल जातो आणि तो खाली कोसळतो. Yuck! दररोज स्वतःचीच लघवी पितो हा तरुण; विचित्र सवयीबाबत केला अजब दावा अचानक घडलेल्या या घटनेमुळे हा व्यक्ती काही वेळ स्तब्ध होतो पण हिंमत सोडत नाही. यानंतरही त्याचा व्यायाम सुरूच आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की खाली पडल्यानंतर हा व्यक्ती उठताच प्लॅटफॉर्मवर टिक करून पुशअप करण्याचा प्रयत्न करू लागतो. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याला बातमी देईपर्यंत २ लाख २६ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. वापरकर्ते व्यायाम करणाऱ्या व्यक्तीच्या कधीही हार न मानण्याच्या भावनेचं कौतुक करत आहेत आणि हा प्रेरणादायी व्हिडिओ शेअर केल्याबद्दल आयपीएस अधिकारी काबरा यांचेही आभार मानत आहेत.