लंडन, 29 एप्रिल : स्वतःला हेल्दी आणि फिट ठेवण्यासाठी प्रत्येकाचं आपापलं एक रूटिन असतं. प्रत्येकाच्या काही सवयी असतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक व्यक्ती मात्र स्वतःचीच लघवी पितो. (Man Drinks His Own Urine) . फक्त वाचूनच हे विचित्र वाटतं आहे ना? बरं याला तसा कोणताही मानसिक आजार वगैरे नाही की ज्यामुळे तो हे करतो. आपण काय करत आहोत याची पूर्ण शुद्ध त्याला आहे. खरंतर आपण असं केल्याने अनेक आजारांपासून मुक्त झालो आहोत, असा अजब दावाच त्याने केला आहे. यूकेच्या हॅम्पशायरमध्ये राहणारा 35 वर्षांता हॅरी मेटाडीन (Harry Matadeen). दररोज स्वतःचीच 200 मिमी लघवी पितो. ही लघवी दोन महिने जुनी असते. याचे त्याने चमत्कारीक फायदे असल्याचाही दावा केला आहे (Man Drinks His Own Aged Urine). एका ठिकाणी त्याने याबाबत वाचलं आणि 2016 साली त्याने युरिन प्यायला सुरुवात केली. युरिनमघील घटकांनी त्याचं आयुष्य खूप बदलल्याचा दावा त्याने केला आहे. आता आपल्या या सवयीला कोणत्याही किमतीला बदलणार नसल्याचं त्याने सांगितलं आहे. हे वाचा - ऐकावं ते नवल! स्वतःचे घाणेरडे, दुर्गंधीयुक्त मोजे विकून लक्षाधीश झाला हा तरुण हॅरी मेटाडीनच्या दाव्यानुसार, 90 टक्के पाणी असलेल्या युरिनमध्ये शरारीतील सर्व आजार ठिक करण्याची क्षमता असते. यामुळे मेंदू चांगलं कार्य करतं आणि खूप शांती मिळते. जुनी लघवी प्यायल्याने त्याला आपल्या कित्येक वर्षे जुन्या डिप्रेशनपासून मुक्ती मिळाली आहे. इतकंच नव्हे तर ही लघवी तो आपल्या चेहऱ्यावरही लावतो. आपल्या शरीरावरही तो क्रिमऐवजी युरिन लावतो. याला तो आपल्या चमकदार त्वचेचं सिक्रेट समजतो. यामुळे आपण तरुण दिसतो. आपण आपल्या वयापेक्षा 10 वर्षे लहान दिसतो, याचं सिक्रेट हेच आहे. हे वाचा - बोंबला! Fictional character च्या प्रेमात पडला, लग्नही केलं; पण आता झाला भलताच वांदा स्वतःची लघवी प्यायल्याने फायदा होत असल्याचं हॅरीला वाटत असलं तरी त्याच्या कुटुंबाला हे आवडत नाही. या विचित्र सवयीमुळे ते त्यालाही पसंत करत नाही. त्याच्या मित्रांमध्येही तेच लोक आहेत जे या जुन्या इजिप्शियन युरिन थेरेपीवर विश्वास ठेवतात. पण युरिन थेरेपीबाबत डॉक्टर म्हणाले की यामुळे शरीर डिहायड्रेट होतं आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शन पसरू शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.