JOIN US
मराठी बातम्या / Viral / मुलगा आणि सूनेवर नाराज होता वृद्ध; सरकारला दान केली दीड कोटीची संपत्ती, म्हणाले 'या टप्प्यावर..'

मुलगा आणि सूनेवर नाराज होता वृद्ध; सरकारला दान केली दीड कोटीची संपत्ती, म्हणाले 'या टप्प्यावर..'

80 वर्षीय नथू सिंह हे व्यवसायाने शेतकरी आहेत पण आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या कृत्यामुळे ते खूप दुःखी आहेत. नाथू सिंह यांचं म्हणणं आहे की, मुलगा आणि सून त्यांना चांगली वागणूक देत नाहीत

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ 06 मार्च : इंटरनेटच्या या युगात जगण्याचा अर्थही बदलला आहे. एकेकाळी संयुक्त कुटुंबाचा काळ होता, तो आता हळूहळू विभक्त कुटुंबाच्या प्रथेत बदलत आहे. एकेकाळी कुटुंबाचा आधारस्तंभ म्हणवली जाणारी घरातील वडीलधारी मंडळी आता ओझं मानली जात आहेत. ज्या वृद्धाश्रमांची संख्या एकेकाळ अतिशय कमी होती, ती आज सातत्याने वाढत आहे. आपल्याच कुटुंबातील ज्येष्ठांना अपमानास्पद वागणूक देण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधून समोर आला आहे, जिथे एका 80 वर्षीय व्यक्तीने आपला मुलगा आणि सुनेच्या त्रासामुळे आपली संपत्ती राज्यपालांना दान केली. 80 वर्षीय नथू सिंह हे व्यवसायाने शेतकरी आहेत पण आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या कृत्यामुळे ते खूप दुःखी आहेत. नाथू सिंह यांचं म्हणणं आहे की, मुलगा आणि सून त्यांना चांगली वागणूक देत नाहीत, त्यामुळे त्यांनी त्यांची सुमारे 1.5 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता राज्यपालांना दान केली आहे. नियतीचा अजब खेळ! एकाच वेळी 4 बाळांना जन्म देऊनही मिळालं आई होण्याचं सुख; रिकामी राहिली कूस नथू सिंह आपल्या मुलावर इतके चिडले आहेत की त्यांना आपल्या मालमत्तेचा वारस मुलगा आणि सून नको आहे. मुझफ्फरनगरच्या बिरल गावात राहणारे नाथू सिंह सध्या वृद्धाश्रमात राहतात. एका मुलाशिवाय त्यांना तीन मुलीही आहेत. त्यांनी सांगितलं की, आपल्या कोणत्याही मुलाला आपल्या मालमत्तेचा वारस मिळावा अशी आपली इच्छा नाही. नाथू सिंह सांगतात, ‘शनिवारी मी यूपीच्या राज्यपालांना संपत्ती सुपूर्द करण्यासाठी शपथपत्र दाखल केलं, माझ्या मृत्यूनंतर सरकारने या जमिनीवर शाळा किंवा रुग्णालय सुरू करावं, अशी विनंती केली.’

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वृद्ध नाथू सिंह म्हणाले, ‘वयाच्या या टप्प्यावर मी माझा मुलगा आणि सुनेसोबत राहायला हवे होते, पण त्यांनी माझ्याशी चांगली वागणूक दिली नाही. त्यामुळेच मी राज्यपालांकडे मालमत्ता हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून त्याचा योग्य वापर करता येईल. वृद्धाश्रमाच्या प्रभारी रेखा सिंह यांनी सांगितलं की, “नाथू सिंह ठाम होते आणि त्यांनी शनिवारी आपली मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी शपथपत्र दाखल केलं.” नाथू सिंह यांची अशी इच्छा आहे, की त्यांच्या अंत्यसंस्कारासाठीही त्यांच्या कुटुंबातील लोकांनी येऊ नये. दरम्यान, बुढाणा तहसीलचे उपनिबंधक पंकज जैन म्हणाले, “वृद्ध व्यक्तीची विनंती नोंदवण्यात आली आहे. त्यांनी प्रतिज्ञापत्रात सुमारे दीड कोटी रुपयांच्या संपत्तीचा खुलासा केला असून त्यात निवासी घर, शेतजमीन आणि स्थावर मालमत्ता यांचा समावेश आहे. त्याच्या मृत्यूनंतर त्याची अंमलबजावणी होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या