JOIN US
मराठी बातम्या / Viral / बस्सं फक्त एक बाटली दारूची कमाल! फळफळलं नशीब, लखपती बनली व्यक्ती

बस्सं फक्त एक बाटली दारूची कमाल! फळफळलं नशीब, लखपती बनली व्यक्ती

फक्त एक दारूची बाटली विकत घेतली आणि यानंतर या व्यक्तीचं नशीबच पालटलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 24 मे : दारू पिण्याची सवय लय वाईट. दारू च्या व्यसनापोटी कित्येकांनी पैशांचीही नासाडी केली. पण कित्येकांचा खिसे रिकामी करणाऱ्या अशाच दारूमुळे एका व्यक्तीचं नशीब मात्र फळफळलं आहे. दारूच्या फक्त एका बाटलीने कमाल केली. काही क्षणात एक व्यक्ती लखपती बनली आहे. हे अजब प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील हे प्रकरण आहे. इथं राहणाऱ्या मार्क पॉलसन नावाची व्यक्ती दारूमुळे लखपती बनली आहे. बरं त्याचा बार किंवा दारूचं दुकान वगैरे असं काही नाही. तर त्याने स्वतःसाठी एक दारूची बाटली विकत घेतली होती. या एकाच बाटलीने त्याच्या नशीबाची दारं खुली केली. आता ते कसं पाहुयात.

द वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार,  मार्कने 1970 च्या दशकात Domaine de la Romanée-Conti La Tache ची बाटली विकत घेतली. यासाठी त्याने 250 डॉलर्स म्हणजेच आज सुमारे 20 हजार रुपये दिले होते. पण दारू खरेदी केल्यानंतर तो प्यायला नाही. तर त्याने ती त्याच्या तळघरात एका बॉक्समध्ये लपवून ठेवली. तब्बल 50 वर्षे ही बाटली तिथंच पडून होती. आली लहर केला कहर! एकाच वेळी ढोसली 7 बाटली दारू; 12 तासांतच व्यक्तीचं काय झालं पाहा आता पॉलसनने या जुन्या दारूच्या बाटलीचा लिलाव केला. बोनहॅम स्किनर या ऑक्शन हाऊसने सांगितल्यानुसार, मार्चमध्ये या व्यक्तीने सांगितलं होतं की त्याच्याकडे एक 50 वर्षे जुनी बाटली आहे, ज्याला त्याने कधी स्पर्शही केला नाही. मग आम्ही ती लिलावासाठी ठेवली. आम्हाला ती 50-80 हजार डॉलर्स दरम्यान विकली जाईल, अशी अपेक्षा होती. पण ती तब्बल 106,250 डॉलर्समध्ये विकली गेली.  म्हणजे पॉलसनला या एका दारूच्या बाटलीचे 106,250 डॉलर्स म्हणजे तब्बल 87,83,846 रुपये मिळाले. प्रत्यक्षात पॉलसन हा एक व्यावसायिक चित्रकार होता. पण त्याला दुर्मिळ आणि विशेष प्रकारची वाईन ठेवण्यात विशेष रस होता. त्याच्या एका मित्राने त्याला ला टॅचेची बाटली विकत घेण्यास सांगितलं. कारण ती अशी वस्तू होती, जी कोणीही आयुष्यात फक्त एकदाच घेऊ शकत होता. काय म्हणावं हिला! एक ग्लासभर दारू एका घोटात संपवली; तरुणीचं काय झालं पाहा VIDEO बोनहॅम स्किनरच्या मते, ला टॅचे इतके दुर्मिळ आहे की जगभरात केवळ 1,300 बाटल्या तयार केल्या जातात. यापैकी बहुतेक 750 मिली बाटल्या देखील आहेत. 3 लीटरच्या बाटल्या खूप कमी बनवल्या जातात. त्यांची दारू प्राचीन दर्जाची मानली जाते. याची गुणवत्ता असाधारण मानली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या