जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आली लहर केला कहर! एकाच वेळी ढोसली 7 बाटली दारू; 12 तासांतच व्यक्तीचं काय झालं पाहा

आली लहर केला कहर! एकाच वेळी ढोसली 7 बाटली दारू; 12 तासांतच व्यक्तीचं काय झालं पाहा

दारू प्यायल्यानंतर तरुणाचा धक्कादायक शेवट.

दारू प्यायल्यानंतर तरुणाचा धक्कादायक शेवट.

व्यक्तीने सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी म्हणून दारू पितानाचा लाईव्ह व्हिडीओ केला.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

बीजिंग, 24 मे : दारू म्हणताच अनेक दारूड्यांच्या तोंडाला पाणीच सुटलं असेल. तुम्ही पाहिलं असेल दारू पिताना अनेकदा कॉम्पिटिशनही लावली जाते. कोण किती किंवा कोण पटापट दारू पितं, अशा काही स्पर्धा. आता तर का सोशल मीडियावर फेमस होण्यासाठीही लोक काही ना काही स्टंट करताना दिसतात, त्यात आता दारूही अपवाद ठरली नाही. एका तरुणाने असंच सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी दारू पिण्याचा स्टंट केला पण त्यानंतर त्याच्या असा शेवट झाला की तुम्ही विचारही केला नसेल. चीनमधील ही धक्कादायक घटना आहे. सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर असलेला हा तरुण. ज्याचं वय 34 वर्षे.  दारूची बाटली घेऊन कॅमेऱ्यासमोर आला. त्याने दारू पितानाचं लाइव्ह स्ट्रिमिंग केलं. चिनी सोशल मीडियावर त्याने हे लाइव्ह केलं.

News18लोकमत
News18लोकमत

खास चायनीज दारू पिऊन तो त्याचे अनेक व्हिडीओ बनवत असे. त्यात 60 टक्के अल्कोहल असतं. काय म्हणावं हिला! एक ग्लासभर दारू एका घोटात संपवली; तरुणीचं काय झालं पाहा VIDEO त्याने लाइव्हवर हा शेवटचा व्हिडीओ बनवला. ज्यात तो एकामागोमाग एक अशा दारूच्या बाटल्या तो ढोसत गेला. एकाच वेळी तो तब्बल 7 बाटल्या दारू प्यायला. त्या दिवशी त्याने इतर सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरसोबत स्पर्धा लावली होती. ज्यात तो 3 राउंड हरला होता. त्याची शिक्षा म्हणून त्याला या खास दारूच्या 7 बाटल्या प्याव्या लागल्या. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत तो लाइव्ह होता. बुधवारी दुपारी कुटुंबीयांना तो मृतावस्थेतत आढळला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आला पण काहीच फायदा झाला नाही. आता ऑफिसमध्येही बार! कार्यालयातच दारू मिळणार; बिनधास्त प्या, फुल्ल सरकारी परमिशन माहितीनुसार चीनमध्ये मद्यपानाचे असे व्हिडीओ पोस्ट करण्यात बंंदी आहे, त्यामुळे या व्यक्तीचं अकाऊंट बॅन केलं होतं. पण तरी तो प्रत्येक वेळी नवनवे अकाऊंट बनवून त्यावरून व्हिडीओ पोस्ट करत राहिला. त्याचे फॉलोअर्सही बरेच होतं. पण त्याचा आता असा धक्कादायक शेवट झाला. .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात