जाहिरात
मराठी बातम्या / Viral / काय म्हणावं हिला! एक ग्लासभर दारू एका घोटात संपवली; तरुणीचं काय झालं पाहा VIDEO

काय म्हणावं हिला! एक ग्लासभर दारू एका घोटात संपवली; तरुणीचं काय झालं पाहा VIDEO

एका घोटात संपवली ग्लासभर दारू.

एका घोटात संपवली ग्लासभर दारू.

एका घोटात ग्लासभर दारू पिणाऱ्या या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 13 मे :  तुम्ही खाण्यापिण्याची स्पर्धा लावलीच असेल. दारू पितानाही काही लोक कॉम्पिटिशन लावतात. दारू तशी थोडा थोडा घोट पितात. पण काही लोक एका घोटात संपूर्ण दारू पिण्याची स्पर्धा लावतात. अशीच एक तरुणी जी एक ग्लासभऱ दारू एका घोटात प्यायली. तरुणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तुम्ही तरुणांना दारूची बाटली थेट तोंडाला लावून दारू पिताना पाहिलं असेल. ग्लासभर दारू एकाच घोटात पिताना पाहिलं असेल. पण एका तरुणीनेही असा प्रयत्न केला. त्यामुळे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वजण हैराण झाले आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक तरुणी बसली आहे. तिच्या हातात एक मोठा ग्लास दारू आहे. ग्लास पूर्णपणे दारूने भरलेला आहे. तरुणीच्या समोर तिच्या मित्रमैत्रिणी आहेत. जे तिला इतकी दारू एका घोटात पिण्यास सांगत आहेत. तरुणी सुरुवातीला विचार करते. त्यानंतर ती तो ग्लास तोंडाला लावते आणि गटागटा दारू पिऊन टाकते. दारू संपेपर्यंत ती ग्लास तोंडातून बाहेर काढत नाही. दारू संपल्यानंतर तिचे मित्रमैत्रिणीही थक्क होता. तरुणी तोंडाला लागलेली दारू पुसताना दिसते. 5 मिनिटांत सुटेल बेवड्या नवऱ्याची दारू; हा घ्या सर्वात सोपा फॉर्म्युला @Figensport नावाच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ती कोणत्याही पुरुषाला हरवू शकते, असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे.

जाहिरात

तुम्हाला या व्हिडीओबाबत काय वाटतं, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. दारू पिताना लक्षात ठेवा मद्यपान करताना काही जणांना पैज (Bet) लावण्याची सवय असते. यात प्रामुख्यानं एका वेळी पूर्ण बाटली संपवणं, बाटली पहिल्यांदा कोण संपवणार किंवा कोण जास्त दारू पिणार अशा पैजांचा समावेश असतो. या गोष्टी करणं शरीरासाठी धोकादायक असतं. त्यामुळे मद्यपान करतेवेळी खेळ, स्कोलिंग रेस अशा गोष्टी टाळाव्यात. तसंच कमी वेळेत जास्त दारू पिणं टाळावं. अल्कोहोलमध्ये कोणत्याही प्रकारचं एनर्जी ड्रिंक मिक्स करणं टाळावं. कारण यामुळे जास्त मद्यपान केलं जाऊ शकतं. तळीरामांनो सावधान! तुम्हीही दारूसोबत असा चकणा खाताय का? एकदा जरूर पाहा Healthdirect.gov.au ने दिलेल्या माहितीनुसार, दारूच्या दुष्परिणामांपासून दूर राहण्यासाठी प्रौढांनी आठवड्यातून 10 पेक्षा जास्त ड्रिंक्स आणि एका दिवसात चारपेक्षा जास्त ड्रिंक्स घेऊ नयेत. एका स्टॅंडर्ड ड्रिंकचं प्रमाण बीअरसाठी (Beer) 330 मिली, हार्ड अल्कोहोलसाठी (जीन, व्हिस्की) 30 मिली आणि वाइनसाठी (Wine) (रेड आणि व्हाइट) 150 मिली एवढं असतं. एका ड्रिंकमध्ये सुमारे 10 ग्रॅम इथेनॉल (अल्कोहोल) असतं. शरीर एका तासात या मात्रेवर प्रक्रिया करू शकतं. त्यामुळे या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात मद्यपान करू नये. अन्यथा शारीरिक नुकसान किंवा हॅंगओव्हर होऊ शकतो. एखादी व्यक्ती अति प्रमाणात मद्यपान करत असेल, तर त्या व्यक्तीला हृदय, किडनी, लिव्हर किंवा मेंदूशी संबंधित आजार अथवा कॅन्सर होऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात