मुंबई 19 मार्च : माणसाच्या नशिबाचा भरवसा नाही. ते कधी पलटेल, हे सांगता येत नाही. जर वेळ चांगली असेल तर नशीब तुम्हाला एका क्षणात श्रीमंत बनवतं, पण जर वेळ वाईट असेल तर नशीब तुम्हाला पुढच्याच क्षणी भिकारीही बनवतं. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत घडलं, जो अचानक 100 कोटींचा मालक झाला, परंतु त्याची संपत्ती काहीच दिवस राहिली आणि तो पुन्हा रस्त्यावर आला.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करत तरुणाचा स्टंट, पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा, Video व्हायरल
जर एखाद्या व्यक्तीने नियोजन न करता हातात आलेले पैसे वाचवण्याऐवजी मौजमजेवर खर्च केले तर त्याची अवस्था ब्रिटनमध्ये राहणाऱ्या जॉन मॅकगिनेससारखी होऊ शकते. द सनच्या रिपोर्टनुसार, जॉनला त्याच्या नशिबाच्या जोरावर करोडोंचा फायदा झाला पण तो आपली संपत्ती सांभाळू शकला नाही. त्याने आपले छंद अशा अविवेकी पद्धतीने पूर्ण केले की 100 कोटींची मालमत्ताही त्याच्यासाठी कमी पडली.
जॉन याला 1997 साली 100 कोटी रुपयांची लॉटरी लागली होती, म्हणजेच त्याला घरबसल्या इतके पैसे मिळाले होते. अशा स्थितीत ब्रिटनमधील रहिवासी जॉनने हे पैसे विनाकारण उडवण्यास सुरुवात केली. त्याने बेंटले, मर्सिडीज, जग्वार, फेरारी आणि बीएमडब्ल्यू मॉडेल्सच्या गाड्या खरेदी केल्या आणि स्वतःसाठी 13 कोटी रुपयांचा आलिशान बंगला खरेदी केला. याशिवाय 5 कोटींचे सीफेसिंग अपार्टमेंट खरेदी केल्यानंतर त्याने सुमारे 30 कोटी रुपये कुटुंबावर खर्च केले.
नियोजन न करता पैसे गुंतवल्यानंतर त्याला समजलं की त्याने लॉटरीच्या पैशातून जे काही जमा केलं होतं ते त्यानं गमावलं. द सनशी बोलताना जॉनने सांगितलं की, त्याने केवळ आलिशान कारच खरेदी केल्या नाहीत तर अनेक आलिशान ठिकाणी सुट्ट्याही घालवल्या. त्याने कबूल केलं की त्याने जिंकलेले सर्व पैसे केवळ आरामदायी जीवन जगण्यासाठी वाया घालवले पण आता तो आपल्या शॉपिंगचे बिल कसे भरणार याची भीती त्याला वाटत आहे. एकेकाळी केवळ डिझायनर कपडे घालणारा आणि सुट्टीच्या दिवशी करोडोंची उधळपट्टी करणारा जॉन म्हणतो की आता तो गरीब झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags:Lottery, Viral news