मराठी बातम्या /बातम्या /Viral /वाहतूक नियमांचे उल्लंघन करत तरुणाचा स्टंट, पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा, Video व्हायरल

वाहतूक नियमांचे उल्लंघन करत तरुणाचा स्टंट, पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा, Video व्हायरल

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

आजकाल प्रकाश झोतात येण्यासाठी लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वचजण काही ना काही हटके करण्याचा प्रयत्न करत असतात. सोशल मीडियावर चर्चेत येण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चाललेली पहायला मिळत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 19 मार्च : आजकाल प्रकाश झोतात येण्यासाठी लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वचजण काही ना काही हटके करण्याचा प्रयत्न करत असतात. सोशल मीडियावर चर्चेत येण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चाललेली पहायला मिळत आहे. त्यामुळे लोक वेगवेगळे स्टंट आजमावत प्रसिद्धीस येण्याचा प्रयत्न करतात. मात्र कधी कधी ही हटके स्टाईल करणे त्यांना महागातही पडतं. सोशल मीडियावर दिवसभरात असे अनेक व्हिडीओही समोर येत असतात. अशातच या व्हिडीओंमध्ये आणखी एक भर पडली आहे.

सद्या समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. अनेकवेळा रस्त्यांवर स्टंटबाजी करताना तरुण स्वत:चा जीव पणाला लावतात तसेच अनेकांचा जीवही धोक्यात घालतात. वाहनांवर स्टंटबाजी करताना तो अपघातांना बळी ठरतात. त्याचबरोबर अनेक स्टंट व्हिडिओंची दखल घेऊन पोलिसांच्या वतीने कारवाई करून चलानही केले जाते. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील आहे.

व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रामपूरच्या रस्त्यावर फुल स्पीडने बाईक चालवत स्टंट करताना दिसत आहे. हे पाहून रामपूर पोलिसांनी कारवाई करत स्टंट तरुणाची दुचाकी जप्त करून त्याला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, बाईकवरून फुल स्पीडने जात असताना एक तरुण हात वर करत स्टंट करत होता. यादरम्यान त्याच्या जोडीदाराने त्याचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. जो व्हायरल झाल्यानंतर यूजर्स चांगलेच संतापले आणि त्यांनी त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी सुरू केली. त्यानंतर कारवाई करत पोलिसांनी तरुणाला अटक करून त्याच्यावर 9,100 रुपयांचे चलन ठोठावले.

दरम्यान, अशा प्रकारे स्टंटबाजी केल्यामुळे दररोज अनेक मोठे अपघात होत असल्याचे युजर्सचे म्हणणे आहे. ज्याचा बळी पडून सर्वसामान्य जनता अनेकदा मृत्यूच्या दारात जाते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यावर खूप प्रतिक्रिया येत आहेत.

First published:

Tags: Shocking, Stunt video, Top trending, Video viral, Viral