JOIN US
मराठी बातम्या / Viral / असा चालक होणे नाही! ड्रायव्हिंगचा हा जबरदस्त VIDEO पाहून येईल अंगावर काटा

असा चालक होणे नाही! ड्रायव्हिंगचा हा जबरदस्त VIDEO पाहून येईल अंगावर काटा

सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यात चालकाच्या परफेक्ट ड्रायव्हिंग (Perfect Driving) स्किलमुळे मोठा अपघात टळला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 12 ऑगस्ट : गाडी चालवणं हे पाहताना जितकं सोपं वाटतं त्यापेक्षा हे काम कितीतरी अवघड असतं. ड्रायव्हिंग (Driving) करण्यासाठी केवळ स्किलच नाही तर संयमही गरजेचा आहे. काही लोकं अत्यंत योग्य पद्धतीनं कार किंवा बाईक चालवतात, तर काही मात्र गाडी चालवतानाही हलगर्जीपणा करतात. यामुळे असे लोक अनेकदा स्वतःसोबतच इतरांचा जीवही धोक्यात टाकतात. रस्त्यावर हलगर्जीपणामुळे झालेल्या अपघातांचे अनेक व्हिडिओ (Accident Videos) तुम्ही पाहिले असतील. मात्र, सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यात चालकाच्या परफेक्ट ड्रायव्हिंग (Perfect Driving) स्किलमुळे मोठा अपघात टळला. हुबेहूब आईसारखी अ‍ॅक्टिंग करत चिमुकलीनं वेधलं लक्ष; VIDEO पाहून पोट धरून हसाल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रस्त्याच्या चारही बाजूंनी पाणी आहे. एक लॉरी वाला आपली गाडी घेऊन येत आहे, इतक्यात रस्त्याच्या बाजूला असलेली एक कार अचानक रस्त्यावर येते. कार लॉरीला धडकणार इतक्यात लॉरी ड्रायव्हर आपल्या सतर्कतमुळे लॉरी एकदम वळवतो. हे करताना त्याची गाडी दोन वेळा डिसबॅलन्स होते, मात्र तो अत्यंत सावधगिरीनं ही परिस्थिती सांभाळतो. लॉरी ड्रायव्हरच्या सावधानतेमुळे केवळ अपघात होण्यापासून वाचत नाही, तर गाडीचं नुकसानही वाचतं. हा व्हिडिओ तुमच्याही पसंतीस पडला असेल.

संबंधित बातम्या

नावेत बाईक घेऊन जाण्याचा प्रयत्न भोवला; दुचाकीसह नदीत कोसळला युवक, पाहा VIDEO सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर gaddiyan_wale नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ पाहून सगळेच लॉरी ड्रायव्हरच्या परफेक्ट ड्रायव्हिंगचं कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअर करण्याबरोबरच लोकं यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. अनेकांनी तर कमेंट करत असंही म्हटलं, की हा चालक नासाकडून ड्रायव्हिंग शिकून आला आहे. मात्र, हा मजेशीर व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे, हे समजू शकलेलं नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या