JOIN US
मराठी बातम्या / Viral / वयाने लहान पुरुषासोबत 35 वर्षे लिव्ह इन रिलेशन, वयाच्या साठीत असा परिणाम; महिलेला मोठा धक्का

वयाने लहान पुरुषासोबत 35 वर्षे लिव्ह इन रिलेशन, वयाच्या साठीत असा परिणाम; महिलेला मोठा धक्का

कित्येक वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारं हे कपल चर्चेत आलं आहे.

जाहिरात

35 वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारं कपल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 05 मे : लिव्ह इन रिलेशन तुमच्यासाठी आता नवं नाही. असे किती तरी कपल आहे जे लिव्ह इनमध्ये राहतात. म्हणजे लग्न न करता नवरा-बायकोसारखे ते एकत्र असतात. असंच एक कपल जे तब्बल 35 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनमध्ये राहिलं. वयाने लहान पुरुषासोबत महिलेने लिव्ह इन रिलेशन ठेवलं. आता हे कपल साठीच्या उंबरठ्यावर आहे. वयाची साठी गाठताच महिलेला या रिलेशनमध्ये मोठा धक्का बसला आहे. ब्रिटनमधील हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. ग्राहम मार्टिन आणि अँड्रिया मरे. यांच्या नात्याची सुरुवात 1988 साली झाली.  गेल्या 35 वर्षांपासून हे कपल लग्न न करता नवरा-बायकोसारखे एकमेकांसोबत राहिले. ग्राहम आणि अँड्रिया यांनी शारीरिक संबंध ठेवले. त्यांना मुलं झाली. मुलांची लग्न होऊन त्यांनाही मुलं झाली. दोघंही आजी-आजोबा बनले. ग्राहम अँड्रियावर खूप प्रेम करत होता, त्यांची एंगेजमेंट झाली होती. पण आपण लग्न करणार नाही, असं त्याने ठरवलं होतं. आपली एकमेकांना साथच पुरेशी असल्याचं तो म्हणाला. ग्राहम आता 58 वर्षांचा आहे तर अँड्रिया  60 वर्षांची. हे कपल नुकतंच स्कॉटलँडच्या एका बीचवर फिरण्यासाठी गेलं. तिथं ग्राहमने जे केलं ते पाहून अँड्रिया शॉक झाली. खरंच की काय? कपलचं नाल्यात रोमँटिक फोटोशूट; PHOTO VIRAL, सर्वजण शॉक लग्न न करण्याचा निश्चय केलेल्या मार्टिनचं मन अचानक बदललं. आता त्याने अँड्रियाला मोठं सरप्राईझ दिलं. त्याने तिला नातवंडं खेळवण्याच्या या वयात लग्नासाठी मागणी घातली. अँड्रियालाही सुखद धक्का बसला. मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार अँड्रिया म्हणाली, इतकं अविश्वसनीय प्रपोजल होतं की मला विश्वास बसला नाही. मार्टिनचा अंदाज खूपच रोमँटिक होता. या वयातही त्याच्यात रोमान्स आहे हे पाहून खूप चांगलं वाटलं. त्याने माझ्या 88 वर्षांच्या वडिलांची परवानगी घेऊन मला प्रपोज केलं. ग्राहमने गुडघ्यावर बसून अँड्रियाला लग्नासाठी विचारलं. तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिला रडू कोसळलं तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू येऊ लागले. Oh No! LIVE TV वर नको त्या अवस्थेत दिसली अँकर; VIDEO पाहताच तिला तोंड दाखवणंही मुश्किल झालं वय वाढलं पण प्रेम कमी झालं नाही हेच या कपलने आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या