सध्या प्री-वेडिंग फोटोशूटची खूप क्रेझ आहे. लग्नाआधी नवरा-नवरी रोमँटिक ठिकाणी रोमँटिक फोटो काढतात. असंच एक प्री-वेडिंग फोटोशूट म्हणून काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो - Twitter/@gganeshhh)
या फोटोत कपल चक्क नाल्यात दिसतं आहे. कपलने नाल्यात फोटोशूट केलं आहे. (फोटो: Twitter/@charsi050993)
अस्वच्छ पाण्यात कचऱ्याच्या मध्ये त्यांनी हसत हसत आपले फोटो काढले आहेत. (फोटो: Twitter/@charsi050993)
एक फोटो तर हैराण करणारा आहे, ज्यात कपल रोमान्स करताना दिसतं आहे. एकमेकांना किस देतं आहे. (फोटो: Twitter/@charsi050993)
एकंदर फोटो पाहिले तर त्यात वेगवेगळं कपल दिसतं आहे, त्यावरून हे प्री-वेडिंग फोटोशूट असावं असं वाटत नाही आहे. या व्हायरल फोटोची सत्यता न्यूज 18 लोकमतलाही माहिती नाही. (फोटो: Twitter/@charsi050993)
बहुतेकांनी हे फोटो फेक असल्याचं म्हटलं आहे. हे फोटो AI मार्फत बनवण्यात आल्याचं म्हटलं आहे. तुम्हाला या फोटोबाबत काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोसल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. (फोटो: Twitter/@charsi050993)