भडकलेल्या सिंहिणीने तरुणीला पळवलं
नवी दिल्ली 23 जून : सिंह हा केवळ जंगलाचा राजाच नाही तर तो सर्वात भयानक शिकारीही आहे. मात्र असं असलं तरी जवळजवळ प्रत्येकाला सिंहाला एकदा तरी पाहण्याची इच्छा असते. यामुळे अनेक लोक जंगल सफारीसाठी जातात आणि या वन्य प्राण्याला पाहण्याचा आनंद घेतात. बहुतेकदा सफारीमध्ये उपस्थित प्राणी विनाकारण कोणावरही हल्ला करत नाहीत. पण प्राण्यांच्या मूडचा काहीही भरवसा नसतो. त्यांचा मूड कधी बदलेल आणि ते कधी आक्रमक होतील, हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे या प्राण्यांसमोर नेहमी सावध राहाणंच चांगलं. Viral Video: बकरीसमोर उभा राहून बनवत होती रील; पुढच्याच क्षणी तरुणीसोबत नको ते झालं आता जंगली सफारीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक तरुणी सिंहाच्या जवळ जाताच सिंहिणीने तिला चांगलीच अद्दल घडवली. @findgoddd या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. यात तुम्ही पाहू शकता, की सिंह समोर दिसताच एक महिला त्याला स्पर्श करण्यास सुरुवात करते. हे पाहून शेजारी बसलेल्या सिंहिणीला इतका राग आला, की तिने लगेचच महिलेला तिथून पळवून लावलं. सिंहीणीने महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करताच सगळेच घाबरले. हा व्हिडिओ आतापर्य़ंत 2.29 लाखहून अधिकांनी पाहिला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की सफारीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या महिलेला सिंह-सिंहिण जोडप्याला पाहून आनंद झाला. भीती वाटत असतानाही ती हळूहळू सिंहाकडे जाऊ लागली. व्हिडिओ बनवणारा व्यक्ती सिंहांसोबतचा तरुणीचा व्हिडिओ बनवत आहे. हा व्हिडिओ अधिक खास बनवण्यासाठी तो महिलेला सिंहाच्या जवळ येण्यास वारंवार सांगत होता. शेवटी घाबरत ही तरुणी सिंहाला स्पर्श करायला गेली. मात्र, महिलेने सिंहाला स्पर्श करताच सिंहीण संतापली. तरुणीनं सिंहाला हात लावताच सिंहीणीने तिचा अशा प्रकारे पाठलाग केला की बिचारी जीव वाचवण्यासाठी धावू लागली. सिंहाला हात लावण्याचा असा परिणाम होईल, याची कल्पनाही तिने केली नसेल. सिंहीण महिलेकडे धावतच व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओच्या कॅप्शननुसार, हे दृश्य आफ्रिकेच्या जंगलातील आहे. अनेकांनी कमेंटमध्ये विचारलं आहे, की या महिलेचं पुढे काय झालं?