JOIN US
मराठी बातम्या / Viral / इवल्याशा पिल्लाने हिंस्त्र सिंहाची हवा केली टाईट; का घाबरला जंगलाचा राजा?व्हायरल होतोय VIDEO

इवल्याशा पिल्लाने हिंस्त्र सिंहाची हवा केली टाईट; का घाबरला जंगलाचा राजा?व्हायरल होतोय VIDEO

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका मोठ्या दगडावर बसलेला सिंह जंगलात चिल करत बसलेला दिसत आहे. इतक्यात मागून एक छोटा सिंह हळूच त्याच्याकडे येताना दिसतो.

जाहिरात

हिंस्त्र सिंहाची हवा टाईट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 15 मे : लहान पिल्लू माणसाचं असो किंवा प्राण्याचं, जेव्हा मस्ती करण्याची वेळ येते तेव्हा दोघेही सारखेच वागतात. सिंह आणि त्याच्या पिल्लाचा व्हायरल झालेला व्हिडिओ बघता तरी असंच दिसतं. बब्बर सिंहाला ‘धप्पा’ देत असल्याप्रमाणे छोटं पिल्लू अचानक समोर येत सिंहाला घाबरवतं, असं व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ तुमच्याही नक्कीच पसंतीस उतरेल. हरणाजवळ जात गोरिलाने जे काही केलं ते पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, मन जिंकणारा VIDEO व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका मोठ्या दगडावर बसलेला सिंह जंगलात चिल करत बसलेला दिसत आहे. इतक्यात मागून एक छोटा सिंह हळूच त्याच्याकडे येताना दिसतो. शावकाच्या कृत्य बघून तो आपल्या वडिलांसोबत लपाछपी खेळत असल्याचा भास होतो. सिंहाला याची काहीच कल्पना नसल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. पिल्लू त्याच्या अगदी जवळ येताच सिंह खूप घाबरतो. यादरम्यान त्याची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. नेटिझन्सना या पिल्लाची गोंडस स्टाईल आवडली आहे.

संबंधित बातम्या

आपल्या वडिलांसोबत मजा करतानाचा शावकाचा हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @waowafrica नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. वृत्त लिहिपर्यंत व्हिडिओला 12 हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत, तर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने सिंहाचा हवाला देत लिहिलं आहे, तूने तो एक पल के लिए डरा ही दिया था. दुसरा वापरकर्ता म्हणतो, सिंहाची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. तो चांगलाच घाबरला होता. आणखी एका यूजरने कमेंट केली, आज कळालं की सिंहांचीही हवा टाईट होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या