JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video: जंगलाच्या राजासोबत पंगा घेणं भोवलं; हल्ला करत सिंहाने जबड्यात पकडला हात, अन्...

Viral Video: जंगलाच्या राजासोबत पंगा घेणं भोवलं; हल्ला करत सिंहाने जबड्यात पकडला हात, अन्...

प्राणीसंग्रहालयातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात एका व्यक्तीला पिंजऱ्यातील सिंहाने अशा प्रकारे पकडलं की हे पाहून कोणाचाही थरकाप उडेल

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 16 मार्च : सोशल मीडियावर लोकांना अनेकदा असं काहीतरी करायचं असतं की ते पाहून लोकांनी त्यांची प्रशंसा करावी. पण या शो ऑफच्या नादात अनेकदा प्राण्यांचा छळ तर होतोच. मात्र, यासोबतच ते स्वतःचा जीव धोक्यात घालतात. अशा परिस्थितीत अनेक वेळा हे लोक मोठ्या संकटातही अडकतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्येही असंच काहीसं पाहायला मिळतं, ज्यात एका व्यक्तीने सिंहासमोर नको ती हिंमत दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुढच्याच क्षणी सिंहाने त्याला अद्दल घडवली. Stunt Video : त्या तिघांचा बाईकसोबत धोकादायक स्टंट, गाडीचं पुढचं चाक उचललं आणि… इंस्टाग्राम अकाउंट extinction.animale वर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सिंहासमोर नको ते धाडस दाखवणं, या व्यक्तीला चांगलंच महागात पडल्याचं पाहायला मिळतं. या व्यक्तीने नको तो पराक्रम करत सिंहाच्या पिंजऱ्यात हात घातला. पुढच्याच क्षणी सिंहाने त्या व्यक्तीचा हात अशा प्रकारे पकडला की त्याला स्वतःची सुटका करून घेता येईना.

संबंधित बातम्या

प्राणीसंग्रहालयातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात एका व्यक्तीला पिंजऱ्यातील सिंहाने अशा प्रकारे पकडलं की हे पाहून कोणाचाही थरकाप उडेल. तो माणूस पिंजऱ्यात बसलेल्या सिंहाला बाहेरून डिवचत होता. त्याच्याशी पुन्हा पुन्हा पंगा घेत होता. शेवटी त्याला सिंहाने अशा प्रकारे उत्तर दिलं की तो आयुष्यात अशी चूक पुन्हा करणार नाही. खरं तर ती व्यक्ती पिंजऱ्यातील सिंहाला कमकुवत समजत होती. मात्र ही चूक त्याला चांगलीच महागात पडली. पिंजऱ्यात ठेवलेल्या सिंहाने व्यक्तीचा हात अशा प्रकारे पकडला की तो पुन्हा सोडायला तयार नव्हता.

सिंहाच्या जबड्यात हात अडकलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ पाहून सगळेच थक्क झाले. तो माणूस आपला हात सोडवण्यासाठी पुन्हा पुन्हा स्वत:ला मागे खेचत होता. मदतीसाठी ओरडत होता. मात्र त्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे आलं नाही. कॅमेऱ्यात कैद झालेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच यूजर्सनी आधी हा संपूर्ण व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या व्यक्तीला फटकारलं. व्हिडिओ बनवण्याऐवजी ती व्यक्ती बचावासाठी पुढे आली असती, तर सिंहाच्या जबड्यात अडकलेल्या व्यक्तीला वाचवणं सोपं झालं असतं, असं बहुतांश युजर्सचं म्हणणं आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 70 हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या